वरळीत हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचा नेता पोलिसांच्या ताब्यात

Worli Hit and Run case : मुंबईतील वरळी येथे भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याची घटना रविवारी पहाटे घडली होती. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला आहे. अपघातानंतर मिहीर शाह हा फरार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अपघात झाला त्यावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा गाडी चालवत होता. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकटवर्तीय देखील मानले जातात. मिहीर शहा आणि चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील वरळी येथे भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याची घटना रविवारी पहाटे घडली होती. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला आहे. अपघातानंतर मिहीर शहा हा फरार झाला होता. 

(नक्की वाचा- Pune News : पुण्यातील ही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित; पोलिसांनी जारी केली यादी)

मिळालेल्या माहितीनुसार, कोळी दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे 5.30 च्या सुमारास कारने या दाम्पत्याला धडक दिली. वरळीच्या अटरिया मॉल परिसरात ही घटना घडली. 

अनियंत्रित कार आपल्या दिशेने येत आहे हे दिसताच सतर्क झालेल्या पतीने कारच्या बोनेटवर उडी घेतली. मात्र महिलेला तसं शक्य झालं नाही. भरधाव कारने दोघांना धडक देत काही अंतरावर फरफटत नेलं. मात्र पती कारच्या बोनेटवर असल्याने फार दुखापत झाली नाही.

Advertisement

(नक्की वाचा- छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश)

अपघातानंतर मिहीर शहाने घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेनंतर परिसरातील नागरिक या दाम्पत्याच्या मदतीला धावले. महिलेला तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांना महिलेला मृत घोषित केलं. वरळी पोलिसांनी याप्रकरणी मिहीर शहा आणि अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Topics mentioned in this article