मुंबईतील महत्त्वाचा मानला जाणारा एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज बंद होणार आहे. परळ आणि प्रभादेवी दरम्यानचा हा पूल रहदारीसाठी महत्त्वाचा मानला जातो. एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज बंद होत असल्याने मध्य मुंबईतील वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवडी-वरळी कनेक्टर प्रकल्पाचा भाग म्हणून MMRDA हा पूल पाडून पुनर्बांधणी करणार आहे. सायन आरओबी, कारनॅक ब्रिज, बेलासिस ब्रिज आणि रे रोड ब्रिज बंद झाल्यानंतर हा मुंबईतील पाचवा ब्रिटिशकालीन पूल असेल. या ब्रिजचे आयुष्य संपले असल्याने सुरक्षेच्या कारणास्त याची पुनर्बांधणी केली जात आहे. मात्र हा ब्रिज बंद झाल्यानंतर मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोडींच्या समस्येला सामोरे जावं लागू शकतं.
(नक्की वाचा- Political News : ठाकरे गटाला कोकणात खिंडार? उद्धव ठाकरेंचा शिलेदार भाजपात प्रवेश करणार?)
एल्फिन्स्टन ब्रिजवरील वाहतूक बंद केल्याने ही वाहतूक टिळक पूल (दादर) आणि करी रोड ब्रिजकडे वळवली जाईल. या दोन्ही मार्गांवर वाहतुकीचा आधीच प्रचंड भार आहे. त्यात आता गर्दीच्या वेळी वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीवर आणखी ताण येण्याची शक्यता आहे.
एमएमआरडीएच्या सूत्रांनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवडी-वरळी कनेक्टर जलद पूर्ण करण्यासाठी जोर देत आहेत. जेणेकरून जवळपास 15 टक्के वाहतूक अटल सेतू पोहोचेल. एल्फिन्स्टन आरओबीच्या पुनर्बांधणीला 19 इमारती अडथळा ठरत असल्याने उशीर झाला. मात्र आता हा प्रश्न सुटल्याने पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
(नक्की वाचा- अजित पवारांच्या समोरच राडा! धस, मुंडे सर्वांसमोर भिडले, बीड DPDC बैठक गाजली)
नवीन एल्फिन्स्टन ब्रिज हा सेनापती बापट रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडला जोडणारा डबल डेकर उड्डाणपूल असेल. तसेच हा ब्रिज शिवडी येथील MTHL आणि वरळी येथील वांद्रे-वरळी सी लिंकला थेट कनेक्ट होईल. 27 मीटर उंच असलेला हा ब्रिज ईस्टर्न फ्रीवे, आंबेडकर रोड फ्लायओव्हर आणि रेल्वे रुळांवरून जाईल.