Mumbai News: महिलांच्या स्वच्छतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी मुंबई महापालिकेने (BMC) सुरू केलेल्या 'पिंक टॉयलेट' सुविधेचा चक्क व्यावसायिक वापर होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील गजबजलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरात उभ्या असलेल्या एका पिंक टॉयलेट बसच्या मागील भागात गेल्या वर्षभरापासून अनधिकृत कॅफे चालवला जात होता. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेच्या 'ए' विभागाने गुरुवारी रात्री उशीरा कारवाई करत हा कॅफे सील केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने पालिकेने या फिरत्या 'महिलांसाठी स्वच्छतागृह' बस सुरू केल्या आहेत. मात्र, फॅशन स्ट्रीटजवळील एका बसमध्ये प्रसाधनगृहाच्या जोडीलाच खाद्यपदार्थांचे दुकान थाटण्यात आले होते. प्रसाधनगृह आणि खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी असल्याने स्वच्छतेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
VIDEO
(नक्की वाचा- Naresh Arora: राष्ट्रवादीने नरेश अरोरांना का दूर केलं? सूत्रांकडून धक्कादायक माहिती उघड फ्री प्रेसच्या वृत्तानुसार, या कॅफेच्या व्यवस्थापक गीता मेहर यांनी दावा केला होता की, त्यांना स्थानिक माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी हे दुकान चालवण्याची परवानगी दिली आहे. मेहर यांनी सांगितले की त्या नगरसेवकांच्या कार्यालयात काम करतात आणि त्यांच्या सांगण्यावरूनच हा व्यवसाय सुरू आहे. या वादावर स्पष्टीकरण देताना मकरंद नार्वेकर यांनी सांगितले की, त्यांनी केवळ अर्जाचा विचार करण्याची शिफारस केली होती. याचा अर्थ वैध परवान्याशिवाय व्यवसाय करावा असा होत नाही. महापालिकेने नियमानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. (नक्की वाचा- Dharashiv News: धाराशिवमध्ये 'भोंगा' वाजणार! रोज 2 तास टीव्ही राहणार बंद; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय) माध्यमांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. गुरुवारी रात्री पालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कॅफेमधील किचनचे साहित्य आणि इतर उपकरणे जप्त केली. या कॅफेकडे महापालिकेचा कोणताही अधिकृत परवाना किंवा आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले आहे. महिलांच्या मूलभूत गरजांसाठी राखीव असलेल्या जागेवर अशा प्रकारे हॉटेल सुरू झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. महापालिकेची धडक कारवाई