रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर चित्रपट धुरंधरमध्ये शरारत गाण्यावर जबरदस्त डान्स करणारी अभिनेत्री आयशा खान हिला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, आणि काही वेळाने तिला सोडून देण्यात आलं. ती मुंबईतील नीट पेपरफुटी प्रकरणात सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनाचं समर्थन करीत असल्याची माहिती आहे.
मी शांततेत रस्त्यावर उभी होते तेव्हाच...
आयशा खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, मी शांततेत रस्त्यावर उभी होते. मी एक शब्दही उच्चारला नाही. मी आंदोलनात सहभागीही झाले नव्हते. त्यापूर्वीच मला आणि माझ्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या व्हिडिओत एक मुलगा म्हणतो, आज माझं प्रॅक्टिकल होतं, मात्र कारण नसताना मला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुढे तिने म्हटलंय, यांच्याकडे काहीच उत्तर नाही. मी केवळ रस्त्यावर उभी होते. तेव्हा ३-४ महिला पोलिसांनी मला खेचलं आणि धक्का देऊन ताब्यात घेतलं.
दादर भागात आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला वरळी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. आज विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो असताना मला ताब्यात घेण्यात आल्याचं आयेशा खान हिने सोशल मीडियावर व्हिडीओ करत सांगितलं. काही वेळेनंतर त्यांना सोडून दिलं असल्याच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world