जाहिरात

Mumbai Pune Expressway: पुण्याची वाट मोकळी, पण मुंबईचे काय? मुख्यमंत्र्यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

Mumbai Pune Expressway traffic update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरातील वाहतूक स्थिती आणि सुरू असलेल्या कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Mumbai Pune Expressway: पुण्याची वाट मोकळी, पण मुंबईचे काय? मुख्यमंत्र्यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
Mumbai Pune Expressway traffic update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे.
मुंबई:

Mumbai Pune Expressway traffic update :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरातील वाहतूक स्थिती आणि सुरू असलेल्या कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या मार्गावरील परिस्थितीवर प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुविधेसाठी यंत्रणा सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मार्गावरील अडथळे दूर करून वाहतूक पूर्ववत करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित झालेल्या या मार्गावरून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलल्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील 3 लेन आता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर सध्या एकाच लेनमधून वाहतूक सुरू असून, पुढील 1.5 तासात उर्वरित मार्गही पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

( नक्की वाचा : Alandi flood: आळंदीला पुराचा वेढा! पहिल्या मजल्यापर्यंत चढले पाणी; भक्त निवासातून 'त्या' 24 जणांना कसे वाचवले? )

प्रशासनाकडून मदतकार्य वेगाने सुरू

या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध आपत्कालीन पथके आणि संबंधित विभाग पूर्ण समन्वयाने काम करत आहेत. आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर रस्ता साफ करण्यात आला असून उर्वरित कामही वेगाने पूर्ण केले जात आहे. या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्वतः घटनास्थळावर उपस्थित असून ते संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवून आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्याचे प्रवाशांना आवाहन

सध्या सुरू असलेल्या कामांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी सध्या मुंबई-पुणे महामार्गावरील आपला प्रवास टाळावा, असे त्यांनी म्हटले आहे. प्रवासादरम्यान वाहतूक पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे आणि अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असेही त्यांनी आवाहान केले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com