जाहिरात

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता होणार 10 लेनचा सुपरहायवे? MSRDC चा प्रस्ताव काय?

या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 14,900 कोटी रुपये आहे. त्याच्या आर्थिक आराखड्याचे काम सुरू आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता होणार 10 लेनचा सुपरहायवे? MSRDC चा प्रस्ताव काय?
पुणे:

मुंबई पुणे एक्सप्रेस हाय वे वर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसते. त्यामुळे आत्ताचा असलेला हाय वे ही कमी पडत आहे. शिवाय वाहतूक कोंडी होताना ही दिसत आहे. यावर तोडगा काढण्याचा विचार सरकार मार्फत केला जात आहे. सध्या विस्तारीकरणाचं काम ही सुरू आहे. त्यातून मुंबई पुणे अंतर कमी होण्याचा दावा सरकारने केला आहे. त्यासाठी मिसिंग लिंकचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यात आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे 10 लेनचा व्हावा याचा प्रस्ताव आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईपासून पुणेपर्यंतच्या 96 किमी लांब अंतराच्या या महामार्गावर अनेक वेळा वाहतूक कोंडी दिसून येते. सोमवार ते शुक्रवार या काळात दररोज सरासरी 65 हजार पेक्षा जास्त वाहने धावतात. मात्र, शनिवार-रविवारी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जवळपास 1  लाखा पेक्षा जास्त गाड्या या मार्गावर असतात. विशेष म्हणजे दरवर्षी यामध्ये 5 ते 6 टक्क्यांनी वाढ होत असते.  वाढणाऱ्या वाहनसंख्येला तोंड देण्यासाठी दहा लेनचा हा प्रस्तावित विस्तार दीर्घकालीन उपाय म्हणून नवा पर्याय पाहिला जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Political News : "उद्धव साहेब एक फोन करा, आम्ही तयार आहोत", युतीच्या चर्चेवर मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य

या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 14,900 कोटी रुपये आहे. त्याच्या आर्थिक आराखड्याचे काम सुरू आहे. इतक्या मोठ्या खर्चामुळे हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबवण्यात येण्याची शक्यता आहे. या विस्ताराच्या सविस्तर योजनेचे सादरीकरण नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी तयारी आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर करण्यात आला आहे. हा विस्तार भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला असून, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Shocking news: DJ च्या आवाजाने मुलीला आला हार्ट अटॅक, ती तडफत राहिली, रुग्णालय पाहात राहिलं, शेवटी...

सध्या मुंबई ते पुणे हे अंतर सामान्य परिस्थितीत दोन ते तीन तासात पूर्ण केले जाते. मात्र सुट्टीच्या दिवसात हा प्रवास अधिक लांबतो असा सर्वांचाच अनूभव आहे. MSRDC च्या नुसार प्रस्तावित विस्तारामुळे हा अतिरिक्त वेळ जवळजवळ नाहीसा होईल. ज्या वेळी जास्त गाड्यांची गर्दी असते त्या वेळी ही प्रवास अधिक सुरळीत होवू शकतो. भूमी अधिग्रहणाच्या दृष्टीने या प्रकल्पाला फारशी अडचण येणार नाही. सध्याच्या महामार्गालगत असलेली बहुतांश जमीन MSRDC कडे आधीपासूनच आहे. केवळ बोगद्यांच्या परिसरात काही ठिकाणी थोडी अतिरिक्त जमीन आवश्यक असेल.जर दहा लेनचा हा रस्ता झाल्यास मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com