जाहिरात

मुंबई-पुणे अंतर कमी होणार? एक्स्प्रेस वेवरील या प्रकल्पामुळे अपघातातही घट होणार? 

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प जवळपास पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प जून  2025 मध्ये पूर्ण होणार आहे. हा  प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी होणार आहे.

मुंबई-पुणे अंतर कमी होणार? एक्स्प्रेस वेवरील या प्रकल्पामुळे अपघातातही घट होणार? 

मुंबई-पुणे या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या मार्गावर मिसिंग लिंकची उभारणी करण्यात येत आहे. हा मिसिंग लिंक प्रकल्प जून 2025 मध्ये खुला करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. तसेच अपघात देखील कमी होण्यास मदत होणार आहे.  या रोडचं आव्हानात्मक काम असलेल्या केबल स्टेड पूल सध्या पुलाचे काम सुरू आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिसिंग लिंकचा फायदा काय?

मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवासाचे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. तसेच, वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. तसेच आपत्कालीन एक्झिटसाठी 300 मीटरच्या अंतरावर बाहेर पडण्याचा मार्ग आहे. याशिवाय दरड कोसळू नये म्हणून ठिकठिकाणी रॉक बोल्ट लावण्यात आले आहेत. 

(नक्की वाचा-  5 बोगदे, 16 पूल! मुंबईत येताना कसारा घाट लागणारच नाही; समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पाही 99% पूर्ण  )

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प जवळपास पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प जून  2025 मध्ये पूर्ण होणार आहे. हा  प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी होणार आहे. या मार्गाने  प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी हा प्रकल्प 2019 मध्ये हाती घेतला होता.

खोपोलीपासून लोणावळ्यातील कूसगाव बाहेर जाण्यासाठी दुहेरी बोगदा बांधला जात आहे, ज्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर केबल-स्टेड ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प जून 2025  पर्यंत पूर्ण होईल. संपूर्ण प्रकल्प एमएसआरडीसीद्वारे राबवण्यात येत आहे. 13.3 किमी लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत 1.67 किमी आणि 8.92 किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पासाठी जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

(नक्की वाचा-  Badlapur to Navi Mumbai : बदलापूर ते नवी मुंबई अवघ्या 20 मिनिटांत; MMRDA चा नवा प्रकल्प)

मिसिंग लिंकवर सर्वात उंच पूल आणि रुंद बोगदा बांधण्यात येत आहे. हा बोगदा आशिया खंडातील सर्वात मोठा आणि रुंद बोगदा आहे. "खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हा सध्याचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सेक्शन 19.8  किमीचा आहे. जो आता 13.3  किमी होईल. या प्रकल्पामुळे  मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर 6  किमीने कमी होणार आहे. तर  प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. केबल-स्टेड पूल हा 650  मीटर लांबीचा असून या खांबाची उंची 190 मीटर  आहे. खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हा सध्याचा 19 किमीचा एक्स्प्रेस वे एक 'झिरो फॅटल इटी कॉरिडॉर' बनवण्यासाठी आणि  उतार आणि घाटाचा भाग टाळण्यासाठी हा प्रकल्प आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com