ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Dadar Railway Station Todays Incident : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.दादर रेल्वे स्थानकावर खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळं एका तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पडला आहे.धावत्या लोकलखाली झोपून जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे पोलिसांनी प्राण वाचवले आहेत.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर चर्चगेट–बोरीवली स्लो लोकल सुटल्यानंतर ही थरारक घटना घडली.पोलीस शिपाई ए.ए.नरवाडे व सहकाऱ्यांची प्रसंगावधान राखून धाडसी कामगिरी केली आणि तरुणाच्या मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर काढले.पोलिसांनी तरुणाचा पाय खेचून त्याला ट्रेनखालून सुरक्षित बाहेर काढले.दरम्यान,जीव वाचल्यानंतर या तरुणाने त्याचा नाव आणि पत्ता सांगण्यास नकार दिला.पोलिसांच्या अलर्टमुळे या स्थानकावर मोठी दुर्घटना टळली.
नक्की वाचा >>Pankaja Munde: "रिटायर्ड व्हावंसं वाटतं..", पंकजा मुंडेंच्या विधानानं खळबळ, बीडच्या परळीत असं का म्हणाल्या?
त्या तरुणाने नाव आणि पत्ता सांगण्यास दिला नकार
लोकल वेग पकडण्याआधीच पोलिसांनी तरुणाचे पाय धरून त्याला रुळाखालून सुरक्षितपणे बाहेर खेचले.वेळीच हस्तक्षेप झाल्याने तरुणाचा जीव वाचला.मात्र बचावानंतरही त्या तरुणाने आपले नाव आणि पत्ता सांगण्यास नकार दिला आहे.
नक्की वाचा >> डिलिव्हरी बॉयचं काम, मेंदीचे कोनही विकले; आता Whatsapp चे ग्लोबल हेड; कुणाल शाहचं अख्खं आयुष्यच प्रेरणादायी
सध्या त्याच्याकडे चौकशी केली जात असून त्याला समुपदेशनासाठी पाठवण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रसंगावधान राखून काम करणाऱ्या पोलिसांच्या या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.