जाहिरात

Pankaja Munde: "रिटायर्ड व्हावंसं वाटतं..", पंकजा मुंडेंच्या विधानानं खळबळ, बीडच्या परळीत असं का म्हणाल्या?

कधी कधी राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं",असे भावनिक वक्तव्य राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

Pankaja Munde: "रिटायर्ड व्हावंसं वाटतं..", पंकजा मुंडेंच्या विधानानं खळबळ, बीडच्या परळीत असं का म्हणाल्या?
Pankaja Munde Speech Today

आकाश सावंत, प्रतिनिधी 

Pankaja Munde Latest News:  "बीड-परळी महामार्गावरचा रस्ता एवढा खोदून ठेवला आहे की, त्या खडबडीत रस्त्यावरून प्रवास करताना मी माझ्या पीएला म्हटलं आता कंटाळा आलाय. वयाच्या 24 वर्षापासून या भागात काम करते आहे.आता 48 वर्षांची झाले. तब्बल 24 वर्षे याच रस्त्याने,याच लोकांसाठी आणि त्याच प्रश्नांशी झुंज देत प्रवास सुरू आहे. कधी कधी राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं",असे भावनिक वक्तव्य राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

"लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही,तर.."

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथे लोकनेते तथा हरीत क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.आपल्या भाषणात त्यांनी बीड-परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर नाराजी व्यक्त करताना राजकीय प्रवासातील अनुभवही मांडले. मात्र, सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहिल्यानंतर आपला विचार बदलल्याचेही त्यांनी सांगितले. "इथे आल्यानंतर तुमचा उत्साह,तुमचं प्रेम आणि विश्वास पाहिला. तेव्हा मला जाणवलं की लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही,तर तुमचा विकास करण्यासाठी आहे",असंही मुंडे म्हणाल्या. 

नक्की वाचा >> डिलिव्हरी बॉयचं काम, मेंदीचे कोनही विकले; आता Whatsapp चे ग्लोबल हेड; कुणाल शाहचं अख्खं आयुष्यच प्रेरणादायी

पंकजा मुंडेंच्या भाषणाची होतेय मोठी चर्चा 

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाची कामे गतीने करण्यासाठी आपण अधिक जोमाने काम करू,अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
पंकजा मुंडे यांच्या "रिटायर्ड व्हावंसं वाटतं" या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.जनतेच्या पाठिंब्यामुळे नव्याने प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याने त्यांच्या भाषणाकडे विशेष लक्ष वेधले गेले.

नक्की वाचा >> Mumbai News: 46 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून काढली 5.5 KG वजनाची गाठ, यामागचं कारण वाचून थक्कच व्हाल

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com