जाहिरात

डिलिव्हरी बॉयचं काम, मेंदीचे कोनही विकले; आता Whatsapp चे ग्लोबल हेड; कुणाल शाहचं अख्खं आयुष्यच प्रेरणादायी

कुणाल यांचं हेच काम पाहून मार्क झुकरबर्ग यांची कंपनी मेटाने कुणाल शाह यांना मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचं ग्लोबल हेड म्हणून नियुक्त केलं आहे.

डिलिव्हरी बॉयचं काम, मेंदीचे कोनही विकले; आता Whatsapp चे ग्लोबल हेड; कुणाल शाहचं अख्खं आयुष्यच प्रेरणादायी
AI Image

Kunal Shah's Inspiring Life : ना कुठली मोठी पार्श्वभूमी, ना हातात पैसा... तंत्रज्ञानाची पदवीही नाही. तरीही भारतीय स्टार्टअप जगतात स्वतःचं वेगळं साम्राज्य निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे 'क्रेड'चे संस्थापक कुणाल शाह. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, छोट्या-मोठ्या नोकऱ्या आणि कामं करत कुणाल शाह यांनी देशातील अब्जावधी रुपयांच्या फिनटेक क्षेत्राची दिशा बदलून दाखवली. 

कुणाल यांचं हेच काम पाहून मार्क झुकरबर्ग यांची कंपनी मेटाने कुणाल शाह यांना मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचे ग्लोबल हेड म्हणून नियुक्त केलं आहे.

कुणाल शाह यांचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ते अवघे १६ वर्षांचे असताना त्यांना कौटुंबिक व्यवसायात मोठा आर्थिक फटका बसला. घराला हातभार लावण्यासाठी कुणाल यांनी अगदी कमी वयात काम करायला सुरुवात केली. घरपोच साहित्याची डिलिव्हरी करणे, मेंदीचे कोन्स विकणे, सीडी अन् मॅग्नेटिक टेप्स विकणे, अशी अनेक कामं त्याने सुरुवातीच्या पातळीवर केली. कॉलेजचा खर्च आणि घर चालवण्यासाठी त्यांनी सायबर कॅफे आणि बीपीओमध्ये काम केलं, तसेच ट्यूशनही घेतल्या.

तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी ते ड्रॉपआऊट

सामान्यतः टेक स्टार्टअपचे संस्थापक आयआयटी किंवा आयआयएमचे पदवीधर असतात. मात्र, कुणाल शाह यांनी मुंबईच्या प्रसिद्ध विल्सन कॉलेजमधून तत्त्वज्ञान विषयात बी.ए.ची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी 'नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज'मधून एमबीएला प्रवेश घेतला. परंतु पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष व्यवसायात उतरून काम करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटले. म्हणूनच त्यांनी एमबीएचे शिक्षण अर्ध्यावर सोडलं आणि उद्योग सुरू केला. 


२०१० मध्ये कुणाल शाह यांनी संदीप टंडन यांच्यासोबत 'फ्रीचार्ज'ची स्थापना केली. मोबाईल रिचार्जवर आकर्षक डिस्काउंट आणि कॅशबॅक देण्याची ही संकल्पना भारतीय ग्राहकांना प्रचंड आवडली. अवघ्या ५ वर्षांत फ्रीचार्ज इतके मोठे झाले की, २०१५ मध्ये 'स्नॅपडील'ने सुमारे ४०० मिलियन डॉलर (अंदाजे २,४०० ते २,५०० कोटी रुपये) देऊन ही कंपनी विकत घेतली. त्या काळातील हा भारतातील सर्वात मोठा टेक-ॲक्विझिशन सौदा ठरला होता.

'क्रेड'ची स्थापना अन् फिनटेक क्षेत्रातील क्रांती

फ्रीचार्जच्या यशानंतर कुणाल शांत बसले नाहीत. २०१८ मध्ये त्यांनी उच्च क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी CRED ॲप लाँच केले. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणाऱ्या ग्राहकांना रिवॉर्ड्स आणि कॉईन्स देणे. आज 'क्रेड' ही देशातील सर्वात जलद वाढणाऱ्या युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक आहे, जिचे मूल्य कोट्यवधी डॉलर्समध्ये आहे. 

नवउद्योजकांसाठी देवदूत 

आज कुणाल शाह केवळ एक यशस्वी संस्थापक नाहीत, तर देशातील सर्वात सक्रिय 'एंजल इन्व्हेस्टर' पैकी एक आहेत. त्यांनी रेझरपे, उडान, मीशो  यांसारख्या शेकडो भारतीय नवउद्यमी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून तरुण उद्योजकांना पाठबळ दिलं आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com