4 hours ago

Mumbai Rain Red Alert: मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. विशेषतः उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक असून मागील चार तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलंय तर काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्याही घटना घडल्या आहेत. पुढील तीन तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ तसेच 40-60 किमी प्रति तास वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स जाणून घेऊया...
 

Jun 24, 2026 11:35 (IST)

Mumbai Rain Updates: मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

Jun 24, 2026 11:35 (IST)

Mumbai Rain Updates: मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

Advertisement
Jun 24, 2026 11:28 (IST)

Mumbai Rain Update: 24 तासात कुलाबा 248 मिमी तर सांताक्रुझ येथे 225 मिमी पाऊस

  • मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत 300  मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
  • 24 तासात कुलाबा 248 मिमी तर सांताक्रुझ येथे 225 मिमी पाऊस
  • मालवणी येथे 340 तर शहरांत परळ भागांत 334 मिमी पाऊस 

Jun 24, 2026 11:26 (IST)

Mumbai Rain Update: मुंबईत सकाळी 7 वाजेपर्यंत किती मिलीमीटर पावसाची नोंद झाली, पाहा आकडेवारी

Jun 24, 2026 09:36 (IST)

Mumbai Rain Update: Ritu Tawde on Mumbai Rains मुंबईत मुसळधार! मुंबई पावसासाठी किती सज्ज? महापौर रितू तावडे NDTV मराठीवर

Jun 24, 2026 08:54 (IST)

Mumbai Rain Update: मुंबई शहरात 195 मिमी पावसाची नोंद

पश्चिम उपनगरांत दमदार पाऊस

24 तासांत 208 मिमी पावसाची नोंद

मुंबई शहरात 195 मिमी पाऊस 

पूर्व उपनगरांत 167 मिमी पावसाची नोंद

सकाळी 8.28 वाजता 3.41 मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज

संध्याकाळी 7.41 च्या सुमारास पुन्हा भरती येणार

संध्याकाळी 3.41 मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज

Advertisement
Jun 24, 2026 08:53 (IST)

Mumbai Rain Update: किंग्स सर्कल परिसरात पावसाचे पाणी साचलं. वाहनं अडकली

Jun 24, 2026 08:51 (IST)

Navi Mumbai Rain Update: नवी मुंबईत ठिकठिकाणी साचलं पाणी

Advertisement
Jun 24, 2026 08:50 (IST)

Mumbai Rain Update: मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

Jun 24, 2026 08:48 (IST)

Mumbai Rain Update: विक्रोळीतील रहिवासी इमारतीची संरक्षक भिंत कोसळली

Jun 24, 2026 08:47 (IST)

Mumbai Rain Updates:दादर स्टेशनवर रेल्वे रुळांवर साचले पाणी

बीएमसीच्या (BMC) नोंदीनुसार, मंगळवारी (23 जून) सकाळी 8 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजेच गेल्या 24  तासांत मुंबईत 300 मिलिमीटरहून (मीमी) अधिक पावसाची नोंद झाली आहे.

Jun 24, 2026 08:06 (IST)

Rain Update: या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

पुढील 3 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

Jun 24, 2026 07:42 (IST)

Mumbai Rains रात्रभर पाऊस, मुंबईच्या लोकल ट्रेनवर परिणाम, पाहा कुठे ट्रेन ठप्प? कुठे रेल्वे उशिराने

Jun 24, 2026 07:42 (IST)

Mumbai Rains | मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पाहा मुंबईच्या पावसाचे अपडेट

Jun 24, 2026 07:36 (IST)

Mumbai Rains: मुंबई, पालघरला हवामान खात्याचा 'रेड नाऊकास्ट' इशारा! मुंबई आणि उपनगरात पावसाची जोरदार हजेरी (येथे क्लिक करा)

Mumbai News: भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी बुधवारी (२४ जून) सकाळी 'रेड नाऊकास्ट' (Red Nowcast) इशारा जारी केला आहे.

Jun 24, 2026 07:34 (IST)

Mumbai Rain Update: मुंबईत सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार

Jun 24, 2026 07:33 (IST)

Mumbai Rain Update: किंग्स सर्कल परिसरात पाणी साचलं

Jun 24, 2026 07:32 (IST)

Mumbai Rain Update: अंधेरी परिसरात पावसाचे पाणी साचलं