मुंबईकरांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली असून अखेर मंगळवारी मुंबईत नैऋत्य मोसमी पाऊस अधिकृतपणे दाखल झाला आहे. पावसाचे आगमन होताच भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मुंबई प्रादेशिक केंद्राने बुधवारी (24 जून) सकाळी मुंबई आणि शेजारील पालघर जिल्ह्यासाठी 'रेड नाऊकास्ट' इशारा जारी केली आहे. आगामी 3 तासांत या भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 40 ते 60 किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
Weather Information: Nowcast Warning
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 24, 2026
Date: 24-06-2026
Time of Issue: 0400 Hrs IST
Validity: 3 hours
🔴Red Warning
Weather: Thunderstorm accompanied with lightning and Intense to very Intense spells of rain with gusty winds reaching 40-60 kmph very likely to occur at isolated…
(नक्की वाचा- Omraje Nimbalkar: ओमराजे एकटे पडले, भावाने सोडली साथ? बंधू मकरंद राजेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट)
मान्सून 13 दिवस उशीरा
मुंबईत मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख 10 जून असते. मात्र, यंदा मान्सून तब्बल 13 दिवस उशिराने म्हणजेच 23 जून रोजी दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये मान्सून याहून अधिक उशीरा म्हणजेच 25 जून रोजी मुंबईत पोहोचला होता. मुंबईत मान्सूनच्या आगमनाला सर्वात जास्त उशीर 1974 आणि 1958 मध्ये झाला होता, जेव्हा 28 जून रोजी मान्सूनची नोंद झाली होती. उशीरा का होईना, मान्सूनच्या आगमनामुळे मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमट आणि असह्य उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
#WATCH | Maharashtra | An underpass in Mumbai's Andheri area was closed after it was flooded due to severe water logging amid heavy rains in the city.
— ANI (@ANI) June 23, 2026
A BMC Official Rhitik says, "... We have not been able to find a temporary solution for this severe water logging... Our… pic.twitter.com/QsN7WbXjYw
वाहतूक आणि रेल्वे सेवा पूर्ववत, रस्त्यांवर मात्र कोंडी
मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील पावसानंतरही मुंबईतील सर्व प्रमुख सबवे खुले असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे सेवा काहीशी उशीराने आणि 'बेस्ट' बस सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय धावत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने आणि पावसाच्या संततधारेमुळे मुंबईतील काही प्रमुख महामार्गांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर मात्र वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
(नक्की वाचा- Pune: दुर्घटना नव्हे हत्या! होणाऱ्या पत्नीनेच केतनला लोहगडावरून दरीत ढकललं, पोलिसांना संशय, कारण काय?)
मुंबईत कुठे किती पाऊस?
महानगरपालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात मुंबईत ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
- नायर हॉस्पिटल (सेंट्रल मुंबई)- 78.96 मिमी (सर्वाधिक)
- एन. एम. जोशी मार्ग (लोअर परळ) - 78.4 मिमी
- परळ टीटी- 72.63 मिमी
- मालाड बस डेपो (पश्चिम उपनगर) - 61.8 मिमी
- महाराष्ट्रनगर, मानखुर्द (पूर्व उपनगर)- 51.2 मिमी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world