
Mumbai Temperature : मुंबईत काही दिवसांपासून उन्हाचा ताप जाणवू लागला असून मंगळवारपर्यंत मुंबईचं तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांताक्रूझ येथे कमाल तापमान रविवारी 37.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तापमानातील वाढीबरोबरच वाढत्या आद्रतेमुळे उष्मा अधिक प्रमाणात जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वातावरण बदलादरम्यान विविध आजार डोकं वर काढत असतात. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या दिवसात नागरिकांनी हायड्रट राहणं आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या आहारात पुरेसं पाणी किंवा विविध प्रकारच्या फळांच्या रसाचा समावेश वाढवावा.
बातमी अपडेट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world