जाहिरात

Mumbai Cold News : मुंबई गारठली! 12 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच थंडी पडली आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावले आहे.

Mumbai Cold News : मुंबई गारठली! 12 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

Mumbai's temperature drops : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा घसरला आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आला होता. विशेष म्हणजे मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच थंडी पडली आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावले आहे. विशेष म्हणजे गेल्या १२ वर्षात नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 

मुंबईत १२ वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान...


ऐरवी मुंबईकरांना कायम उकाडा सहन करावा लागतो. मात्र गेल्या काही दिवस मुंबईकरांसाठी सुखावह गेले आहेत. थंडीसाठी स्वेटर, कानटोप्या कपाटातून बाहेर काढल्या जात आहेत.  पुणे आणि लोणावळा परिसरातून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा घसरून १६.२ पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात दोन ते चार अंशानी वाढ होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी २०२४ मध्ये २९ नोव्हेंबरला तापमानाचा पारा १६.५ पर्यंत घसरला होता, तर त्यानंतर २०२३ मध्ये ३० नोव्हेंबरला १९.७, २०२२ मध्ये २२ नोव्हेंबरला १७ अंश सेल्सिअर इतकं तापमान नोंदवलं गेलं होतं. २०१९ मध्ये मुंबतील तापमान १४.६ अंशावर पोहोचलं होतं. 

Maharashtra Rain : थंडीच्या दिवसात पावसाची तयारी; 'या' तारखेपासून महाराष्ट्रात बरसणार, कोणते जिल्हे अलर्टवर?

नक्की वाचा - Maharashtra Rain : थंडीच्या दिवसात पावसाची तयारी; 'या' तारखेपासून महाराष्ट्रात बरसणार, कोणते जिल्हे अलर्टवर?

    उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा


    सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद जळगावमध्ये करण्यात आली. जळगावमध्ये ८.१ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुण्यात गारठा कायम राहणार असून विदर्भात तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील पारा १० अंशाच्या जवळ पोहोचला आहे. उत्तरेकडून गोठविणारी थंडी महाराष्ट्रावर धडकत असल्याने अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. 


    राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान) 

    अहिल्यानगर: ८.५

    नाशिक: ९.७

    यवतमाळ: १०.४

    जळगाव: ८.१

    मालेगाव: ९.४

    गोंदिया: १०.४

    पुणे: ९.५

    नागपूर: ११.४

    अमरावती: ११.५

    महाबळेश्वर: १२.५

    सातारा: ११

    सांगली: १४.१

    सोलापूर: १५.३

    छत्रपती संभाजीनगर: १०.५

    परभणी: ११.२

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    Listen to the latest songs, only on JioSaavn.com