जाहिरात

​Mumbai University : सावधान! मुंबई विद्यापीठात मार्कलिस्टसाठी लागतेय लाच; लिपिकाला कलिना कॅम्पसमध्येच पकडले

Mumbai University News: मुंबई विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे केंद्र मानले जाते, मात्र याच विद्यापीठात एका वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

​Mumbai University :  सावधान! मुंबई विद्यापीठात मार्कलिस्टसाठी लागतेय लाच; लिपिकाला कलिना कॅम्पसमध्येच पकडले
Mumbai University : मुंबई विद्यापीठात या प्रकरणानं खळबळ उडली आहे.
मुंबई:

Mumbai University News: मुंबई विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे केंद्र मानले जाते, मात्र याच विद्यापीठात एका वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बी.कॉम. पदवीची गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्याकडे पैशांची मागणी करणे या महिला लिपिकाला चांगलेच महागात पडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली असून या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गुणपत्रिकेसाठी लाचेची मागणी

निकीता विजय राठोड असे अटक करण्यात आलेल्या महिला लिपिकाचे नाव असून त्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील छत्रपती शिवाजी महाराज भवनमधील निकाल कक्षात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. एका तक्रारदाराला त्यांच्या बी.कॉम. पदवीची गुणपत्रिका हवी होती. हे काम करून देण्यासाठी निकीता राठोड यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला मोठ्या रकमेची मागणी केली होती. शासकीय काम करण्यासाठी अशा प्रकारे पैशांची मागणी झाल्यामुळे तक्रारदाराने याविरोधात एसीबीकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

Latest and Breaking News on NDTV

एसीबीचा सापळा आणि अटक

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई युनिटने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. 10 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, निकीता राठोड यांनी गुणपत्रिकेसाठी 10,000 रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरल्यानंतर एसीबीने कलिना येथील विद्यापीठ परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जेव्हा निकीता राठोड यांनी 10,000 रुपयांची लाच स्वीकारली, तेव्हा दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना जाळ्यात पकडले.

( नक्की वाचा : Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून आऊट; अटकेसाठी पोलीस रवाना, फडणवीस सरकारमधील दुसरी विकेट )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com