जाहिरात

Mumbai News: पेपर चेक न करताच विद्यार्थ्यांना नापास केल्याचा आरोप, युवासेनेचे मुंबई विद्यापीठाविरोधात आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सातत्याने होत असलेला गोंधळासाठी जबाबदार संचालक, परीक्षा व मुल्यमापन डॉ. पुजा रौंदळे यांना पदावरुन मुक्त करावे अशी मागणी युवा सेनेने केली आहे.

Mumbai News: पेपर चेक न करताच विद्यार्थ्यांना नापास केल्याचा आरोप, युवासेनेचे मुंबई विद्यापीठाविरोधात आंदोलन

Mumbai News : मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. युवासेनेच्या सर्व सिनेट मेम्बर्सनी याविरोधात विद्यापीठात आंदोलन केले. सोमवारी दुपारपासून सिनेट मेम्बर्सनी आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा सिनेट मेम्बर्सनी केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सातत्याने होत असलेला गोंधळासाठी जबाबदार संचालक, परीक्षा व मुल्यमापन डॉ. पुजा रौंदळे यांना पदावरुन मुक्त करावे अशी मागणी युवा सेनेने केली आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य  ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य  शितल शेठ देवरुखकर (शिवसेना उपनेत्या), प्रदीप सावंत, मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचडे, परमात्मा यादव, अल्पेश भोईर आणि माजी सिनेट सदस्य  राजन कोळंबेकर यांनी आंदोनल केले.  

(ट्रेंडिग बातमी - Crime News: 50 वर्षाचा शिक्षक, 17 वर्षांची विद्यार्थीनी, 1 वर्षापासून अत्याचार अन् शेवटी...)

कुलगुरु डॉ.अजय भामरे यांच्या दालनाजवळ धरणा धरुन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सातत्याने होत असलेला गोंधळासाठी जबाबदार संचालक, परीक्षा व मूल्यमापन डॉ. पूजा रौंदळे यांना पदावरुन मुक्त करावे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट येथील विद्यार्थी कल्याण भवन इमारत महाराष्ट्र शासनाच्या  माहेड या शैक्षणिक उपक्रमास देऊन विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा गुणांना उत्तेजन देणारे अनेक विभाग सदर इमारती मध्ये असल्याने विद्यार्थी या सर्व सुविधांना मुकणार आहेत. 

(ट्रेंडिंग बातमी - Voter ID Card: घर बसल्या बनवू शकता ऑनलाइन नवीन मतदान ओळखपत्र, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)

माहेडला जागा देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे ठोस कारवाई करण्याचे निर्देश अथवा आश्वासन न दिल्याने धरणा आंदोलन करण्यात येत आहे. किमान चौकशी समिती गठीत करुन कारवाईला सुरुवात करावी, ही मागणी देखील मान्य न केल्याने आंदोलन करण्यात आले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com