Mumbai News: ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. 15 मार्च 2026 पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा निम्यापेक्षा कमी झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर याचा मोठा ताण येत आहे.
पाणीसाठा कमी होण्याची मुख्य कारणे
मुंबईत मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा 35°C च्या वर गेल्याने धरणांमधील साठा वेगाने घटत आहे. कडक उन्हामुळे तलावांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. मार्च महिन्यात उष्णता वाढल्याने नागरिकांकडून पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यंदाचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने पालिका प्रशासन चिंतेत आहे.
(नक्की वाचा- 'Dhurandhar' Trailer: धुरंधर सिनेमातील 'या' कलाकाराची वाढली डोकेदुखी; रोज मिळत आहेत धमक्या)
धरणांमधील सद्यस्थिती
भातसा- 3,39,556
अप्पर वैतरणा- 1,25,457
मध्य वैतरणा - 81,268
तानसा - 60,683
मोडक सागर- 49,388
विहार- 17,489
तुळशी- 4038
(नक्की वाचा- Mumbai News: पोलिसात तक्रार केल्याचा राग, पत्नीला लोकलखाली ढकलून दिले; नराधम नवऱ्याला अटक)
पालिकेचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन
महापालिकेने अद्याप अधिकृत पाणी कपात जाहीर केली नसली तरी, एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते.
- पाणी जपून वापरा: गाडी धुण्यासाठी किंवा फरशी पुसण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा.
- गळती रोखा: घरांत किंवा परिसरात कोठेही नळ गळती असल्यास ती त्वरित दुरुस्त करावी.
- पाणी फेकू नका: शिळे पाणी फेकून देण्याऐवजी त्याचा झाडांसाठी किंवा इतर कामांसाठी वापर करावा.