जाहिरात

Mumbai Water Crisis: टँकर असोसिएशनचा संप आज मिटणार? BMC नोटीस मागे घेणार

Mumbai Water Tanker Strike Update : मुंबईतील टँकर चालकांचा संप मिटण्याची शक्यता आहे.

Mumbai Water Crisis: टँकर असोसिएशनचा संप आज मिटणार? BMC नोटीस मागे घेणार

Mumbai Water Tanker Strike Update : मुंबईतील टँकर चालकांचा (Mumbai Water Crisis) संप मिटण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, मुंबई महानगरपालिका केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीशी संबंधित नोटीस मागे घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. थोड्याच वेळात याबाबतचा निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान टँकर संपामुळे मुंबईतील अनेक बांधकामे, कार्यालय, मॉल अशा विविध ठिकाणी मोठा परिणाम झाला आहे. पाणीच नसल्याने कामं ठप्प झाली आहेत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टँकर असोसिएशन का पुकारला संप?  

- केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी संपाचे हत्यार उपसले. 
- नव्या धोरणानुसार केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी गरजेची आहे. त्यानंतरच मुंबई महानगरपालिका परवानगी देईल, या नियमाचा उल्लेख करण्यात आलाय.
- यानुसार विहिरी, बोअरवेल मालकाला प्रति टँकर 100 रुपये रॉयल्टी केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे. 
- दिवसाला 15 टँकर गृहीत धरून वर्षासाठी 5 लाख 47 हजार 500 रुपये केंद्र सरकारला द्यावे लागतील. 
- यासोबत वर्गवारीनुसार मुंबई महानगरपालिकेला (BMC) देखील 5 हजार रुपये ते 15 हजार रुपयांपर्यंतचा शुल्क द्यावा लागतो.
- ज्या ठिकाणी टँकर भरले जाणार त्या ठिकाणी टँकरच्या पार्किंगची व्यवस्था असावी. रस्त्यावर टँकर भरता येणार नाही.
- पार्किंगची व्यवस्था नसेल तर 200 मीटरपर्यंत तो परिसर खाली असावा.
- यासोबतच केंद्रीय भूजल प्राधिकरणचे कार्यालय हे दिल्ली(Delhi), नागपूर (Nagpur) आणि पुणे (Pune) येथे आहे.
- या कार्यालयाचे संपर्क क्रमांक बंद असल्याचा आरोप टँकर चालकांचा आहे. 
- केंद्र सरकारची परवानगी घेण्यास टँकर चालकाचा आक्षेप नाही, मात्र पार्किंगची अट शिथिल करावी आणि मुंबईत सिंगल विंडो कार्यालय (Mumbai Single Window Office) असावे ही असोसिएशनची मागणी आहे. 

Water Tanker Strike : मुंबईत टँकर चालक संपावर का गेलेत? नेमका विषय काय?

(नक्की वाचा: Water Tanker Strike : मुंबईत टँकर चालक संपावर का गेलेत? नेमका विषय काय?)

बीएमसीने आधी काढला होता हा तोडगा 

मुंबईतील पाणीबाणी संकट दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले होते. मुंबई महापालिकेने शहरातील विहिरी, बोअरवेल आणि खासगी पाण्याचे टँकर नियंत्रणात घेऊन स्वतःच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. यासाठी महापालिकेने एक योजना (SOP) देखील तयार केली होती.

Mumbai water crisis| मुंबईत टँकर चालकांचा संप, नागरिक त्रस्त; काय आहेत नागरिकांच्या प्रतिक्रिया?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: