Mumbai’s biggest Metro depot : ठाण्याजवळ उभारला जाणार सर्वात मोठे मेट्रो डेपो, वाचा संपूर्ण माहिती

Mumbai’s biggest Metro depot : ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे मुंबई मेट्रोसाठी सर्वात मोठा डेपो उभारला जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Mumbai's biggest Metro depot. : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय संचालन व देखभाल केंद्र असून, सीएसएमटी ते मीरा रोड दरम्यान एकूण ५५.९९ किमीच्या मेट्रोमार्गाचे संचालन येथून होईल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सर्व्हे क्रमांक ३०मधील (जुना सर्वे क्रमांक २८) ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या १६ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार एमएमआरडीएला "आहे त्या स्थितीत"  हस्तांतरित करण्यात आली आहे. 

या चारही मार्गिकांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांनी तयार केला होता. एकात्मिकता आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी मोघरपाडा येथे एकच संयुक्त डेपो प्रस्तावित करण्यात आला होता.

मोघरपाडा मेट्रो डेपो हे मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक महत्त्वाचे नियंत्रण आणि देखभाल केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून अखंडित आणि उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित करण्यात येईल. या डेपोच्या माध्यमातून प्रामुख्याने खालील जबाबदाऱ्या पार पाडण्यात येतील.

Advertisement

( नक्की वाचा : Mumbai Metro : पावसाळ्यात मेट्रो रेल्वे सुरळीत राहण्यासाठी आराखडा तयार, वाचा काय करणार उपायययोजना? )
 

काय आहेत प्रमुख वैशिष्ट्ये?

  • मेट्रो सेवा बंद असलेल्या वेळेत गाड्या उभ्या करणे, जेणेकरून गर्दीच्या वेळेस त्या तत्परतेने वापरता येतील.
  • सर्व मेट्रो गाड्यांची मोठी दुरुस्ती (हेव्ही ओव्हरहॉल) व नियमित देखभाल
  • उपकरणे काढणे आणि नवीन बसवणे आणि त्यानंतर सुरक्षेसाठी आवश्यक ती पूर्ण चाचणी करणे
  • ट्रेन व डेपो प्रणालींचे कामकाज सुरळीत करण्यासाठी ऑपरेशन कंट्रोल सेंटर (ओसीसी) आणि डेपो कंट्रोल सेंटर(डीसीसी) यांच्यामार्फत एकात्मिक नियंत्रण कार्यप्रणाली
  • या सर्व सुविधांमुळे मुंबई मेट्रो नेटवर्कमध्ये दीर्घकालीन सेवा कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि भविष्यातील विस्तारक्षमता यांचा मजबूत पाया घातला जाईल.

मोघरपाडा मेट्रो डेपोमधील महत्त्वाच्या सुविधा

  • मोठ्या देखभालीसाठी १० वर्कशॉप ट्रॅक 
  • दैनंदिन आणि नियमित तपासणीसाठी १० निरीक्षण ट्रॅक 
  • रात्री गाड्या उभ्या करण्यासाठी ६४ स्टेबलिंग ट्रॅक 
  • चाकांचे प्रोफाइलिंग करण्यासाठी अंडर-फ्लोअर व्हील लेथ
  • वाहनांची नियमित स्वच्छता करण्यासाठी ऑटो आणि उच्च क्षमता असलेली वॉश यंत्रणा
  • अंडरफ्रेम व छतावरील उपकरणांवरील धूळ काढण्यासाठी ब्लो-डाऊन प्लांट
  • कॅटेनेरी वाहने उभी करण्यासाठी व देखभालीसाठी सीएमव्ही वर्कशॉप
  • संचालनासाठी डेपो कंट्रोल सेंटर (डीसीसी) आणि प्रशिक्षण कक्ष
  • आवश्यक डेपो कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधा


 

Topics mentioned in this article