Mumbra Railway Accident : मुंब्रा-दिवा लोकल दुर्घटनेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा हकनाक बळी गेला.

जाहिरात
Read Time: 1 min

मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा हकनाक बळी गेला. सकाळी ९ ते ९.३० दरम्यान कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि त्याच्या विरुद्ध दिशेने मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये ही दुर्घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये फूटबोर्डावर उभ्या असलेल्या प्रवाशाची बॅग खेचली गेल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान या अपघातात जीआरपी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विकी मुख्यादल असं त्यांचं नाव आहे. विकी ठाणे जीआरपी  पोलिसात काम करीत होते. ते नेमक्या कोणत्या लोकलमध्ये होते याची माहिती कळू शकली नाही. 

नक्की वाचा - CR Accident : बॅगेने घात केला, कसारा-CSMT फास्ट लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू; दिवा-मुंब्रादरम्यान नेमकं काय घडलं?

दरम्यान या दुर्घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना ज्युपिटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.