जाहिरात

पुण्यातील धक्कादायक घटना, भूमिगत मेट्रोच्या वर भलंमोठं भगदाड; मनपाचा ट्रक गायब

पुण्यातील सिटी पोस्ट भागात भर दिवसा रस्त्याला एक भलंमोठं भगदाड पडलं आहे.

पुण्यातील धक्कादायक घटना, भूमिगत मेट्रोच्या वर भलंमोठं भगदाड; मनपाचा ट्रक गायब
पुणे:

पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील सिटी पोस्ट भागात भर दिवसा रस्त्याला एक भलंमोठं भगदाड पडलं आहे. या खड्ड्यात पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रक कोसळला आहे. सुदैवाने चालक वेळीच ट्रकच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव बचावला. धक्कादायक बाब म्हणजे या खड्ड्याच्या खाली भूमिगत मेट्रोचं काम सुरू आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केली जात आहे. भूमिगत मेट्रोमुळे हा खड्डा पडला असेल तर त्या आजूबाजूच्या आस्थापनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिटी पोस्टच्या आवारात रस्त्याला मोठं भगदाड पडलं असून येथून काही अंतरावर दगडूशेठ गणपती मंदिर आहे. जर रस्त्याला मोठं भगदाड पडलं असतं तर मोठा अनर्थ घडला असता. 

बातमी अपडेट होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
रविंद्र चव्हाणांना वाढदिवशीच कुणी डिवचलं? डोंबिवलीत लागलेल्या बॅनरमुळे खळबळ
पुण्यातील धक्कादायक घटना, भूमिगत मेट्रोच्या वर भलंमोठं भगदाड; मनपाचा ट्रक गायब
truck fell into big pit some distance from Dagdusheth Ganpati in Pune shocking CCTV video
Next Article
दगडूशेठ गणपतीच्या काही अंतरावर भगदाड, ट्रकसह 2 दुचाकीही कोसळल्या, धक्कादायक CCTV Video