संजय तिवारी, नागपूर
बोगस जीएसटी बिल घोटाळ्याला आता नवीन वळण मिळालं आहे. ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजी (बेटिंग) करिता बँक खाती वापरण्यात आल्याची नवीन माहिती समोर आली आहे. भंगार विक्रेता आणि कुख्यात अपराधी बंटी साहू याच्या नेतृत्वातील ही टोळी मनी लाँड्रिंग आणि ऑनलाइन गेमिंग व्यवसायाशी देखील जोडली गेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरात 155 कोटी रुपयांच्या बनावट बिलांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. गुन्हे शाखेने भंगार विक्रेता बंटी साहूच्या कार्यालयावर छापा टाकला तेव्हा हवाला आणि आंतरराष्ट्रीय मनी लाँड्रिंग रॅकेटशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या तपासात 87 बनावट कंपन्या आढळून आल्या आहेत आणि पोलिसांकडून सुमारे 1000 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. बंटी साहू हा नागपूरच्या स्मॉल फॅक्टरी परिसरात असलेल्या त्याच्या ऑफिसमधून साक्षी फूड्स नावाची बनावट फर्म चालवत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने तेथून बँक पासबुक, गुंतवणूक रेकॉर्ड, बनावट कंपन्यांचे कागदपत्रे आणि हवाला व्यवहारांशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त केली.
(नक्की वाचा- Kolhapur News : भंगारवाला, दूधवाल्याच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा; शासनाची 100 कोटींची फसवणूक)
बंटीसह त्याचा भाऊ जयेश साहू, व्रजकिशोर मणियार, ऋषी लखानी आणि आनंद हरडे यांना आधीच अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की या रॅकेटचे सूत्रधार बंटी आणि व्रजकिशोर आहेत, ज्यांनी 15 ते 20 लोकांची एक टीम तयार केली होती. ज्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉमर्स पदवीधर होते.
गुन्हे शाखेने बंटी आणि त्याच्या कुटुंबाची आठ बँक खाती गोठवली आहेत आणि त्यांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे. आतापर्यंत, पोलिसांनी 87 बनावट कंपन्या शोधून काढल्या आहेत ज्यामध्ये सुमारे 1000 कोटी रुपयांचे व्यवहार झाले असल्याचं पुढे येत आहे . सध्या, गुन्हे शाखेने चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत , ज्यांच्या तपासात सुमारे 160 कोटी रुपयांच्या बनावट बिलांची निर्मिती उघड झाली आहे.
(Badlapur News: बदलापूरकरांना मोठा दिलासा! पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार)
बनावट जीएसटी बिले तयार करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा खुलासा झाल्याने देशभरात हा विषय चर्चेत आहे. आता किमान 20 जण यात सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून यातील अधिकांश जण चार्टर्ड अकाउंटंट आणि वाणिज्य शाखेतील पदवीधर आहेत. त्यांची ओळखपत्रे जप्त करण्यात आली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या रॅकेटद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर हवालाद्वारे मनी लाँड्रिंग देखील सुरू होते.
मुख्य आरोपी संतोष ऊर्फ बंटी रामपाल साहू याच्या कार्यालयातून छाप्यादरम्यान खळबळजनक कागदपत्रे हाती आली आहेत. या कागदपत्रांतून बनावट शेल कंपन्या, हवाला आणि मनी लाँड्रिंग सारख्या गैर मालिकाच समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी क्षितिज एंटरप्राईज आणि अवध एंटरप्राईज नावाने बोगस जी एस टी बिलाचा कारभार चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आणि दोन्ही मिळून तब्बल 170 संशयास्पद व्यवहारांवरून पडदा उठवला. याशिवाय, प्राईम ट्रेडर्स, तृषा ट्रेडर्स आणि आशिष ट्रेडर्स या आणखी तीन कंपन्यांविषयी माहिती समोर आली असून त्यांच्याद्वारे 160 कोटी रुपयांची बनावट बिले करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
आतापर्यंत पाच जणांना अटक
संतोष ऊर्फ बंटी रामपाल साहू (52 वर्ष)
जयेश रामपाल साहू (36 वर्ष)
ब्रिजकिशोर मणियार (59 वर्ष)
ऋषी लाखानी (59 वर्ष)
आनंद हरडे (23 वर्ष)