संजय तिवारी, नागपूर
प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमध्ये जगभरातील भाविक रोज हजेरी लावत आहेत. नागपूरचं एक कुटुंब देखील प्रयागराजला गेलं होतं. तीर्थयात्रेला कुटुंब बाहेरगावी गेल्याने बंद असलेल्या घरांवर पाळत ठेवून चोरट्यांना डल्ला मारला आहे. या घरफोडीच्या घटनेत एकूण 4 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोरांचा तपास सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सहकुटुंब प्रयागराज येथे कुंभमेळ्यात गेलेल्या घरात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या घरफोडीत एकूण 4 लाख 90 हजार रुपयेचां मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
(नक्की वाचा- Shirish More : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, संघाचे प्रचारक, हभप शिरीष मोरेंनी गळफास घेत संपवलं जीवन)
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पांडे नामक व्यक्ती सहकुटुंब प्रयागराज येथे कुंभमेळ्यात गेले होते. ही संधी साधून चोरांनी खिडकीच्या मार्गाने पांडे यांच्या घरात प्रवेश केला. चोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी केला.
(नक्की वाचा- Praneet More : वीर पहारियाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण)
नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत नुकत्याच दोन ते तीन घरी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. तांत्रिक पद्धतीने आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध लावला आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात येईल. चोर हा सर्राइत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.