Nagpur : नागपूर जिल्ह्यातल्या पेट्रोल पंपावर आता Cash only, वाचा का घेतला निर्णय?

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारचे पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

देशभरातील सर्व नागरिकांनी डिजिटल पेमेंट करावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संपूर्ण सरकारी यंत्रणा प्रयत्नशील असते. या प्रयत्नांना यश येत असून सर्वत्र डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. त्याचवेळी नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारचे पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे निर्णय?

नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार १० मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. 

सध्या देशभरात डिझिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत.

( नक्की वाचा : Devendra Fadnavis : 'जे आले त्यांचा सत्कार, आले नाहीत त्यांचा...' फडणवीसांचा टोला कुणाला? )
 

संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे.

Advertisement

 विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने डिजिटल पेमेंट बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा ग्राहकांवर परिणाम होणार हे निश्चित आहे. डिजिटल इंडियासाठी आग्रही असलेल्या सरकारकडून या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेतली जाते हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव जैस्वाल यांच्या नेतृत्वात हे निर्णय घेण्यात आले आहे.
 

Topics mentioned in this article