- उमरेड वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघीणीने तीन महिन्यांत दोन जणांचा जीव घेतला
- वाघीणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने जंगलात पिंजरा ठेवून विशेष योजना आखली होती
- नागपूरच्या महिला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे यांनी वाघीणीवर अचूक निशाणा साधून तिला बेशुद्ध केले
प्रविण मुधोळकर
Nagpur News: एक नरभक्षी वाघीणीने उमरेड वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घातला होता. या वाघीणीने दोघांचा जीव घेतला. तीन लोकांना अतिशय वाईट पद्धतीने जखमी केलं. तिच्या या कृतीमुळे तिची दहशत संपूर्ण परिसरात पसरली होती. तिचा बंदोबस्त कसा करायचा असा प्रश्न वनविभागा समोर होता. अशा वेळी एका वाघीणीला जेरबंद करण्यासाठी दुसरी वाघीण समोर आली. या दुसऱ्या वाघीणीचं नाव डॉ. प्रियल चौरागडे असं आहे. प्रियल यांच्यामुळे दहशतीत असलेले गाव आले आता निर्धास्त झाले आहेत. नरभक्ष वाघीणीने इथल्या लोकांचे जगण मुश्किल केलं होतं. ऐवढच काय तर लोकांनी शेतात जाणं ही सोडलं होतं.
गेल्या 3 महिन्यांपासून उमरेड वनपरिक्षेत्रात ही वाघाणी धुमाकूळ घालत होती. तिने 2 जणांचा बळी घेतला होता. आता ही नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद झाली आहे. वनविभागाच्या या मोहिमेत नागपूरच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे यांनी दाखवलेले डेअरिंगचे सर्वत्र कौतूक होत आहे. वाघीणीला पकडण्यासाठी वन विभागानं एक प्लॅन केला होता. त्यानुसार जंगलात एक पिंजरा ठेवण्यात आला. त्या पिंजऱ्यात स्वतः बसून डॉ. प्रियल चौरागडे बसल्या होत्या. ती नरभक्ष वाघीण असल्यामुळे प्रियल याच्य तिच्या शिकार होवून बसल्या होत्या. मात्र त्यांचा नेम त्या वाघीणीवर होता. त्यांनी अचून नेम साधत त्या वाघीणीला बेशूद्ध केलं.
वाघिणीवर अचूक बेशुद्धीकरणाचा नेम साधला. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात वाघाला नेम धरून बेशुद्ध करणाऱ्या त्या पहिल्याच महिला पशुवैद्यकीय अधिकारी ठरल्या आहेत. उमरेड वनपरिक्षेत्रात 2.5 ते 3 वर्षे वयाच्या या वाघिणीने दहशत निर्माण केली होती. 27 मार्च रोजी निर्मला गभणे आणि 6 जून रोजी दिगंबर पाटील यांच्यावर हल्ला केला होता. त्या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर 3 जण जखमी झाले होते. वनविभागाने वाघिणीला पकडण्यासाठी कॅमेरा ट्रॅप जागोजागी लावले होते. शिवाय काही ठिकाणी तिच्यासाठी शिकार ही ठेवली होती. वाघीणी तिथे येण्याची वाट पाहीली जात होती. ती आली की तिला जेरबंद करण्याचा प्लॅन होता.
पुढे वाघिणीचे लोकेशन मिळताच डॉ. प्रियल चौरागडे आणि त्यांचे सहकारी प्रतीक घाटे हे जंगलात ठेवलेल्या एका पिंजऱ्यात जाऊन बसले. तब्बल 15 तासांच्या प्रतीक्षेनंतर वाघीण शिकार खाण्यासाठी तिथे आले. त्यावेळी पिंजऱ्यात डॉ. प्रियल होत्या. पिंजऱ्यातून मर्यादित जागा होती. असं असतानाही डॉ. प्रियल यांनी अचूक निशाणा साधत साधला. त्यानंतर त्यांनी वाघिणीला डार्ट मारला. डार्ट लागल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत वाघीण बेशुद्ध झाली. तिला नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत ती पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळले आहे. या कामगिरीमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.