Nagpur School Holiday: नागपुरात शनिवारी सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर; कुणा-कुणाला सुट्टी लागू?

Nagpur School Holiday: नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) 'यलो अलर्ट' जारी करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उद्या, शनिवारी (18 एप्रिल) जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News: विदर्भात सूर्याचा प्रकोप वाढला असून नागपूर जिल्ह्याला उष्णतेच्या तीव्र लाटेने ग्रासले आहे. हवामान विभागाने दिलेला 'यलो अलर्ट' आणि वाढता पारा लक्षात घेता, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उद्या, शनिवार 18 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

कोणाकोणाला असेल सुट्टी? 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, नागपूर जिल्ह्याच्या सीमा क्षेत्रातील खालील संस्था उद्या बंद राहतील. लहान मुलांवरील उष्णतेचा परिणाम टाळण्यासाठी सर्व अंगणवाड्यांना सुट्टी असेल. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही स्तरावरील शाळा बंद राहतील. सर्व महाविद्यालये (Colleges) आणि उच्च माध्यमिक विद्यालये यांचा समावेश असेल. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेसनाही हे आदेश लागू राहतील.

Advertisement

(नक्की वाचा-  Dharashiv News: तहसीलदारांना मुलीसमोरच गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी; परंडा तहसील कार्यालयातील प्रकार)

उष्णतेची लाट आणि प्रशासनाचा इशारा

नागपूरचे तापमान सध्या 43 ते 44 अंशांच्या दरम्यान असून उद्या ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना डिहायड्रेशन किंवा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच पुरेसे पाणी पिणे आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करा. पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे सुती कपडे वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(नक्की वाचा-  Pandharpur News: रिलस्टार महिलेला वाढदिवसाचं भयंकर 'गिफ्ट'; अख्ख गाव हादरलं! प्रियकराला अटक)

विदर्भातील स्थिती

नागपूरसह अकोला, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा चढलेला आहे. विदर्भात सध्या कोरडी उष्णता असल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. उन्हाचा हा प्रकोप पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे.
 

Topics mentioned in this article