Nagpur News: नागपुरात वर्षभरात 616 तरुणांना संपवलं जीवन; आत्महत्यांमागील कारणेही धक्कादायक

Nagpur News: नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 1011 व्यक्तींनी आत्महत्या केली असून, यात 616 तरुणांचा समावेश आहे. बेरोजगारी आणि मानसिक तणाव ही यामागची मुख्य कारणे असल्याचे पोलीस दप्तरी नोंदवण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News: नागपूर जिल्ह्यामध्ये बेरोजगारी, मानसिक तणाव आणि कौटुंबिक कलहामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक वास्तव समोर आले आहे. गेल्या वर्षभरातील ही आकडेवारी सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने एक धोक्याची घंटा मानली जात आहे.

नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या वर्षभरात आत्महत्येच्या घटनांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. मूलभूत विकासाच्या दिशेने वेगाने धावणाऱ्या या उपराजधानीत तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस दप्तरातील नोंदीनुसार, गेल्या वर्षभरात 1011 जणांनी टोकाचे पाऊल उचलले असून, यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.

(नक्की वाचा -  Ladki Bahin Yojana: फॉर्ममधील एक प्रश्न अन् लाखो महिला अपात्र! लाडकी बहीण लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली)

वयोगटानुसार धक्कादायक वास्तव

गेल्या वर्षभरात आत्महत्या करणाऱ्यांची वयोगटानुसार आकडेवारी धक्कादायक आहे.

  • 18 ते 30 वयोगट: 198 तरुण-तरुणी.
  • 30 ते 45 वयोगट: 307 तरुण (सर्वाधिक प्रमाण).
  • 45 ते 60 वयोगट: 225 व्यक्ती.
  • 60 वर्षांवरील ज्येष्ठ: 78 व्यक्ती.
  • 14 ते 18 वयोगट: 29 जण
  • 14 वर्षांखालील मुले: 6 मुले.

(नक्की वाचा- Pune News: पुण्यात 'मुले पळवणारी टोळी' सक्रिय? पुणे पोलिसांचे नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी)

आत्महत्यांमागील प्रमुख कारणे

पोलीस तपासात आणि सामाजिक सर्वेक्षणात या आत्महत्येमागे काही ठराविक कारणे प्रकर्षाने समोर आली आहेत.
बेरोजगारी: नोकरीची कमतरता आणि करिअरमधील अपयशामुळे तरुणांमध्ये वैफल्य आले आहे.
मानसिक तणाव: कामाचा ताण आणि भविष्याची चिंता तरुणांना ग्रासत आहे.
कौटुंबिक कलह: घरात होणारे वाद आणि संवादाच्या अभावामुळे अनेक जण टोकाचे पाऊल उचलत आहेत.

नागपूर पोलीस आणि सामाजिक संस्थांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही संकटात घाबरून न जाता मदतीसाठी पुढे यावे. मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन केंद्रांची मदत घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article