'कसं काय पुणेकर... लोक म्हणाले, फक्त धंगेकर'; पुण्यातील भाजपच्या सभेत नेमकं काय घडलं?

महायुतीच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक सभांचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान बारामती, माढा, सातारा या तीन मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा पार पडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान देशभरात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. महायुतीच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक सभांचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान बारामती, माढा, सातारा या तीन मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले. 

या सभेतील एक किस्सा नाना पटोले यांनी सांगितला आहे.  नरेंद्र मोदींनी पुण्यात मराठीत भाषण केलं. यावेळी ते कसे आहात पुणेकर असं म्हणाले यावर लोकांनी फक्त धंगेकर असं ओरडून म्हटलं. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हा किस्सा सांगितला. पुण्यातून काँग्रेसमधून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपमधून मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय मनसेतून वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरे हेदेखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे पुण्यात मतविभाजन होण्याचा धोका आहे. 

Advertisement

नक्की वाचा - पक्षविरोधी कारवायांमुळे शिवानी वडेट्टीवारांना नोटीस? अखेर पक्षाकडून स्पष्टीकरण

पटोलेंचा प्रकाश आंबेडकरांवर टोला... 
यावेळी नाना पटोले म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काय बोलाव, त्यांनी बोलायला जागा ठेवली नाही. आम्ही त्यांना अनेकदा मैत्रीचा हात दिला पण त्यांना दुसऱ्यांचा फायदा करायचा आहे. जे संविधान संपवायला निघाले आहेत, त्यांना फायदा करून देत आहेत. काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. तिथे वंचितने उमेदवार दिला. त्यांच्या मनात काय आहे? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहे. त्यामुळं काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पुढे नाना पटोले म्हणाले, यंदा भाजपचं अपयश नक्की आहे. कारण यंदाची निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. 

Advertisement