जाहिरात

Raj Thackeray: 'एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन..', राज ठाकरे थेट बोलले, कारणही सांगितलं

प्रत्येकवेळी त्यातून राजकारणचं शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही, उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन.." असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray: 'एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन..', राज ठाकरे थेट बोलले, कारणही सांगितलं

Raj Thackeray On Meeting With Eknath Shinde:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी राज ठाकरेंनी भेट घेतली. या भेटीचे कारण समोर आले नसल्याने नवी राजकीय खेळी असल्याचे बोलले जात होते. अशातच आता या भेटीबाबत स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

काय म्हणाले राज ठाकरे? 

"आपल्याकडे पूर्वीसारखं निकोप राजकारण राहिलेलं नाही. कुणी कुणाला भेटलं की त्यातून युत्या आघाड्या असं राजकारण शोधायचं. आता तीन वर्षांनी निवडणुका आहेत. आता निवडणुका संपलेल्या आहेत. आज ते सत्तेत आहेत. आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील, चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील तर भेटायला नको का? प्रत्येकवेळी त्यातून राजकारणचं शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही, उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन.." असं राज ठाकरे म्हणाले.

Washim News: वाशिम कॉपी प्रकरण: भाजपच्या शिक्षक नेत्याचं आयुक्तांना खरमरीत पत्र; काय केली मागणी?

"आज मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत. ते आम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे. शहराची रोजची स्थिती बिकट अन् भीषण अवस्थेला पोहोचली आहे. रस्ते, फ्लायओव्हर बांधणं म्हणजे विकास नव्हे, ती फक्त सूज आहे. आज सर्वच शहरांमध्ये डेव्हलपमेंट सुरु आहे. अशा परिस्थितीत अनेकांकडे गाड्या आहेत, त्या रस्त्यावर उभ्या आहेत. रस्त्यांवर ट्रॅफिक होत आहे. शहरांमध्ये येणारी माणसं थांबत नाहीत. हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना सांगितली होती, तीच एकनाथ शिंदेंना सांगितली. त्यांनी तात्काळ भुषण गगराणींना फोन केला," असं राज ठाकरेंनी सांगितले.

मनसैनिकांना दिले आदेश

दरम्यान, राज ठाकरे यांनी आज पक्षातील नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाच्या आगामी रणनितीबाबत महत्त्वाचे विधान केले. सत्तेमधल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे. महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे. राजकीय सूज जी आली आहे ती अत्यंत वाईट आहे. मात्र कायमस्वरूपी नाही. अनेक आंदोलन तुम्ही केली  आहेत. पण आता निवडणूक हाच कार्यक्रम आहे, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले.

Bhigwan Case: 'आमचं प्रेम, घरी वारंवार सांगितलं...' अपहरण झालेल्या तरुणीचे प्रतिज्ञापत्र, A टू Z स्टोरी समोर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com