Nashik News: भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ; काय आहे प्रकरण?

Nashik News : बँकेचे चेअरमन, सदस्य असलेल्या अपूर्व हिरे, अद्वय हिरे, प्रशांत हिरेंसह संचालकांची चौकशी करण्याची मागणी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

निलेश वाघ, नाशिक

Nashik News : भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या नावे श्री व्यंकटेश को ऑपरेटिव्ह बँकेतून परस्पर कर्ज काढल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला असून तशी तक्रार मालेगाव कॅम्प पोलिसात दाखल करण्यात आली आहे. 

बँकेचे चेअरमन, सदस्य असलेल्या अपूर्व हिरे, अद्वय हिरे, प्रशांत हिरेंसह संचालकांची चौकशी करण्याची मागणी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संस्थेतील शिक्षकांची दिशाभूल करून शिक्षणाच्या नावे काढलेल्या कर्ज रकमेची स्वतः च्या खात्यावर वर्ग करून कोट्यवधी रुपयाचा अपहार केल्याचा आरोप संस्थेच्या शिक्षकांनी केला. 

(ट्रेंडिंग बातमी - Nana Patole Suspended: सभागृहात हायहोल्टेज ड्रामा! दुसऱ्याच दिवशी नाना पटोले निलंबित)

कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढण्यात आले, मात्र याची माहितीही कर्मचाऱ्यांना नाही. कर्मचारी आपल्या खात्याची माहिती घेण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला. विशेष म्हणजे एक कर्ज काढले असताना  बनावट स्वाक्षऱ्या करून परस्पर दुसरे काढून रक्कम दुसऱ्याच्या नावावर वळती करण्यात आली.

(ट्रेंडिंग बातमी - Assembly News: 'अधिकाऱ्यांना बांधून आणा', मुनगंटीवार भडकले, खोतकर मदतीला धावले, विधानसभेत काय घडलं?)

ज्यावेळी विचारणा केली असता कर्जाची रक्कम एकाच दिवशी भरण्यात आली. अशाच प्रकारे अनेक कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान बँकेचे काम नियमित सुरू आहे. कुठलाही प्रकाराचा गैरव्यवहार झाला नाही. मी भाजपत प्रवेश करत असल्याचे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच राजकीय हेतूने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशी प्रतिक्रिया अपूर्व हिरे यांनी दिली.

Advertisement
Topics mentioned in this article