- ज्योतिषी आणि हनुमान भक्त म्हणवणाऱ्या सचिन देशमुखने नाशिकमधील 321 जणांना कोट्यवधींंना फसवले आहे
- सचिन देशमुखने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची भ्रामक माहिती देऊन तब्बल 36 कोटी 32 लाख रुपये हडपले आहेत
- किराणा दुकानदाराने फसवणुकीचा संशय आल्यावर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण समोर आले
राहुल वाघ
सचिन देशमुख हे नाव सध्या नाशिक पोलिसांच्या रडारवर आहे. हा सचिन ज्योतिषी आहे. ऐवढेच नाही तर तो स्वत: ला हनुमान भक्त म्हणून सांगतो. तो ज्योतिषी असला, हनुमान भक्त असाला तरी याच्या आड त्याने भयंकर कांड केले आहेत. त्यामुळेच तो सध्या नाशिक पोलिसांना हवा आहे. ज्योतिष आणि हनुमान भक्त असल्याचं सांगत त्यांने नाशिकमधील 321 जणांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. त्यानंतर तो हे सर्व पैसे घेवून थेट दुबईत पळाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध लुक आऊट नोटीस काढण्याची वेळ आली आहे.
ज्योतिषी असलेल्या सचिन देशमुख याने भविष्य सांगत शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करण्यास अनेकांना भाग पाडले होते. त्याच्यावर विश्वास ठेववून नाशिकमधील जवळपास 321 जणांनी ही गुंतवणूक केली. ही गुंतवणी थोडी थोडकी नव्हती. तर ती तब्बल 36 कोटी 32 लाख रूपयांची होती. ही गुंतवणूक या लोकांना सचिन देशमुख याच्या मध्यस्थीने केली होती. मात्र ती गुंतवणूक केली गेली नव्हती. तर ते पैसे या भामट्या ज्योतिषाने हडपले होते. हे आता सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
हे पैसे घेवून त्याने पोबारा केला आहे. तो सध्या दुबईत असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस काढली आहे. संशयित ज्योतिष सचिन देशमुख हा हनुमान भक्त आहे. शरणपूर रोड परिसरात त्याचे अंजनीय ज्योतिष कार्यालय आहे. त्याने एका किराणा दुकानदारास अंजनीय ज्योतिष कार्यालयात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडसे होते. शिवाय त्याला तब्बल 73 लाखांना गंडा घातला होता. मात्र आपली फसवणूक झाल्याचा संशय या दुकानदाराला आला. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी किराणा दुकानदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर तब्बल 321 जणांनी सायबर पोलीस ठाण्यात या ज्योतिषा विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. त्याने आमची ही फसवणूक केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलिसांनी 329 जणांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ज्योतिष देशमुखच्या मागावर सायबर पोलीस असून, लूकआऊट नोटीस जारी केली आहे. बुवा, भोंदू, ज्योतिष यांच्या आमिषाला बळी पडू नका असं वारंवार आवाहन केले जाते. तरी ही लोक त्यांच्या आमिषाला बळी पडत असल्याचं या प्रकरणावरून दिसून येत आहे.