अंगावर काटा आणणारा अपघात! कंटेनरने पाठीमागून उडवले, इको कार थेट समोरील ट्रकच्या खाली घुसली; 4 जणांचा मृत्यू

Nashik-Peth Highway Accident: दोन मोठ्या वाहनांच्यामध्ये ही कार अशा प्रकारे दाबली गेली की, त्यातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nashik Peth Highway Accident: हा अपघात इतका भीषण होता की...
नाशिक:

Nashik News: नाशिक-पेठ महामार्गावरील सावळ घाटामध्ये आज संध्याकाळी (मंगळवार, 14 जुलै) एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. एक भरधाव कंटेनर आणि ट्रकच्या दरम्यान मारुती इको कार अक्षरशः चिरडली गेली. दोन मोठ्या वाहनांच्यामध्ये ही कार अशा प्रकारे दाबली गेली की, त्यातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका गंभीर जखमी व्यक्तीने रुग्णालयात उपचारादरम्यान आपला प्राण गमावला. या विचित्र आणि दुर्दैवी अपघातामुळे सावळ घाटात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

कसा झाला अपघात?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिक पेठ महामार्गावरून एक मारुती इको कार जात होती. सावळ घाटातील उतारावरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका वेगवान कंटेनरने या कारला मागून प्रचंड जोरात धडक दिली. हा धक्का एवढा भीषण होता की, कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट समोरील दुसऱ्या एका ट्रकवर जाऊन आदळली.

Advertisement

दोन मोठ्या वाहनांच्यामध्ये कार झाली चक्काचूर

मागून आलेला कंटेनर आणि समोर असलेला ट्रक यांच्यामध्ये मारुती इको कार अक्षरशः सँडविचसारखी दाबली गेली. कार समोरील ट्रकच्या खाली घुसल्याने तिचा पूर्णपणे चक्काचूर झाला. कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर काढणेही कठीण झाले होते. स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

( नक्की वाचा : अंगावर काटा आणणारा अपघात! कंटेनरने पाठीमागून उडवले, इको कार थेट समोरील ट्रकच्या खाली घुसली; 4 जणांचा मृत्यू )

या दुर्दैवी घटनेत कारमधील 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान या जखमी व्यक्तीची प्राणज्योत मालवली. यामुळे या भीषण अपघातातील एकूण मृतांची संख्या आता 4 झाली आहे.

फरार कंटेनर चालकाचा  शोध सुरू

अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पेठ पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणी अधिक तपास करत असून फरार झालेल्या कंटेनर चालकाचा कसून शोध घेतला जात आहे. सावळ घाटात यापूर्वीही अनेक अपघात झाले असून आजच्या या घटनेने महामार्गावरील वेग मर्यादेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 


Topics mentioned in this article