नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून संपूर्ण जिल्हावर पाण्याचं संकट ओढवलं आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीला लागणाऱ्या पाण्याचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीपाल्याची आवक घसरल्याने बाजार समितीत भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असून भाजीपाल्यांचे भाव तिप्पट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यापासून भाज्यांच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहे. किमती कमी होण्याऐवजी अधिक वाढल्या आहेत.
काही भागांमध्ये पावसाअभावी आवक घटल्यामुळे पालेभाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर जास्त पावसात भाज्या लवकर खराब होतात. त्याशिवाय पावसाळ्यात उत्पादनावरही परिणाम होत असतो. अशावेळी मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे किंमतीत मोठी वाढ होते.
नक्की वाचा - Rain Update : मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्याला आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा
त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पालेभाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. ऐरवी 30 ते 40 रूपयांना मिळणारी कोथिंबीरीची जुडी 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 20 रूपयांना मिळणारी शेपू 40 ते 50 रुपये जुडी आणि कांदा पात 50 ते 60 रुपयांपर्यंत वाढले आहेत. हे सर्व भाव नाशिकच्या होलसेल बाजार समितीतील असून त्यानंतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत याचे दर आणखी वाढतात.
नाशिक होलसेल बाजार समितीतील दर
- कोथंबीर 90 ते 100 रुपये जुडी
- मेथी 50ते 60 रुपये जुडी
- शेपू 40ते 50 रुपये जुडी
- कांदा पात 50 ते 60 रुपये जुडी
- वांगे 35 ते 40 रुपये किलो
- फ्लावर 40 ते 50 रुपये नग
- कोबी 25 ते 30 रुपये नग
- सिमला मिर्ची 45 ते 55 रुपये किलो
- लवंगी हिरवी मिरची 50 ते 60 रुपये
- आलं 240 रुपये किलो
- लसूण 200 रुपये किलो
- कांदा 30 ते 40 रुपये किलो