Nashik News : नाशिकमधील हिंसाचार सुनियोजित, दंगेखोरांवर कडक कारवाई करणार : CM देवेंद्र फडणवीस

Nashik Violence : नाशिकच्या पखाल रोडवरील दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Violence : नाशिकच्या पखाल रोड हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 38 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कारवाईचं समर्थ केलं आहे. तसेच नाशिकमधील हिंसाचार हा सुनियोजित असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं की, "नाशिकमधील हिंसाचार सुनियोजित होता. ठरवून दंगल घडवण्याचा इते प्रयत्न झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या नागरिकांनी स्वत: ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि त्याची सुरुवातही त्यांनीच केली. त्याचवेळी जी मंडळी दंगलीत दिसत आहेत त्यांनी जाणीवपूर्वक पोलिसांवर दगडफेक केली आणि दंगा केला. म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे." 

नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला बेड्या ठोकल्या आहेत. तर गुन्हा दाखल होताच काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत. 

(नक्की वाचा- नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)

नाशिकच्या पखाल रोडवरील दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा यांचाही समावेश आहे. कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यात सहभाग असल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Tanisha Bhise Case : दीनानाथ मंगेशकर नाही तर 'या' दोन हॉस्पिटलवर ससूनच्या अहवालात ठपका )

पाणीटंचाईबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?

राज्यातील पाणीटंचाईबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, जिथे जिथे पाणीटंचाई आहे तिथे आपण जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहे. तिथे टँकरने पाणीपुरवठा करायचा की इतर कोणत्या पद्धतीने पाणीपुरवठा करायची याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. राज्यात एप्रिल आणि मे खूप भागात पाणीटंचाई तयार होते. प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा आपण तयार करतो. जिथे पाणीटंचाई आहे तिथे उपाययोजना ठरवायच्या असतात. तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निधी देखील उपलब्ध करुन देतो.