जाहिरात

नवी मुंबई विमानतळावर आता कामगारांचा आवाज बुलंद होणार; रविंद्र चव्हाणांनी सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि माथाडी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने कंबर कसली आहे

नवी मुंबई विमानतळावर आता कामगारांचा आवाज बुलंद होणार; रविंद्र चव्हाणांनी सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या
मुंबई:

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि माथाडी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने कंबर कसली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या संघाच्या विमानतळ व्यवस्थापन समितीची आणि माथाडी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील न्यायाची भूमिका

यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. शासन आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वय राखून कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणावरही अन्याय होणार नाही आणि आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, याच भूमिकेतून कामगार संघटनांनी काम करावे, असे मार्गदर्शनही त्यांनी नवनियुक्त टीमला केले.

विमानतळ व्यवस्थापन समितीची नवी टीम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यामध्ये संयुक्त सरचिटणीस म्हणून रुपेश धुमाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी किरण पवार, युहान केर्सी दोराबाजी आणि सुजित न्यायनिर्गुणे यांची निवड झाली आहे. तसेच सचिव म्हणून प्रभुदास भोईर, मुखांश नाईक आणि गजानन पाटील आगामी काळात समितीचे कामकाज पाहतील. ही समिती विमानतळ प्रकल्पातील कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: 500 पाहुणे येणार अन् हॉलला टाळे! कल्याणमध्ये पालिकेच्या कारवाईने उडाला एकच गोंधळ )
 

माथाडी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

याच कार्यक्रमात अखिल भारतीय माथाडी संघटनेची नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. रायगड जिल्हाध्यक्षपदी जितेश शिंदे यांची वर्णी लागली आहे, तर भिवंडी आणि पालघर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सचिन जोशी काम पाहतील. ठाणे आणि उरण परिसरासाठी विक्रांत भोसले यांची उपाध्यक्षपदी, तर दक्षिण मुंबईसाठी राहुल लहासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरळी विधानसभा क्षेत्रासाठी शैलेश तोडकरी यांना अध्यक्षपद आणि समीर शेख यांना सरचिटणीसपद देण्यात आले आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह कामगार कर्मचारी संघाचे सरचिटणीस सुहास माटे उपस्थित होते. तसेच संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, उपाध्यक्ष साई घोगळे, सचिव शरद येटम, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र राऊत आणि निशांत गायकवाड यांसह मोठ्या संख्येने कर्मचारी संघाचे पदाधिकारी हजर होते. या नवीन नियुक्त्यांमुळे कामगार क्षेत्रात संघटनेची ताकद वाढणार असून प्रलंबित मागण्यांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com