ग्राहकांसाठी Good News; सिडकोच्या घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी होणार!

सिडकोच्या (Cidco House) अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं आता शक्य होणार आहे. सर्वसामान्यांना सिडकोकडून एक चांगली बातमी समोर आली आहे. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. सिडकोच्या (Cidco House) अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार आहेत. सिडकोचे अध्यक्ष संजय सिरसाट यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. सिडकोच्या घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार असल्याची माहिती आहे. जर 30 ते 40 लाखांचं घर असेल तर 3 ते 4 लाख रुपये कमी होतील. त्यामुळे नवी मुंबईतील सिडकोच्या घरांसाठी अर्ज केलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नवी मुंबईतील सिडकोच्या 40 हजार घरांसाठी येत्या 2 ऑक्टोबरला लॉटरी निघणार आहे. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळ सुमारे 40 हजार घरांच्या लॉटरी काढण्यात येणार आहेत. याअंतर्गत वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या रेल्वे स्थानकांजवळ सिडकोची घरं असणार आहेत. कालच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यंदा नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार मजल्यांवरील घरे मिळू शकतील. 

नक्की वाचा - Cidco House : रेल्वे स्टेशनशेजारी घर खरेदी करता येणार, सिडकोच्या 40 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त दसऱ्याला!

याशिवाय 13 हजार कोटींच्या भुखंडाच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला होता. या वादग्रस्त ऐरोलीतील 70 एकरच्या भुखंडाच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली आहे. सिडकोची यापुढे सर्व कामे लोकांच्या समोर उघडपणे होतील, असं आश्वासन सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिलं.