जाहिरात

Cidco House : रेल्वे स्टेशनशेजारी घर खरेदी करता येणार; सिडकोच्या 40 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त दसऱ्याला!

पुढील महिन्यात दसऱ्याला सिडकोच्या घरांचा धमाका होणार आहे.

Cidco House : रेल्वे स्टेशनशेजारी घर खरेदी करता येणार; सिडकोच्या 40 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त दसऱ्याला!
नवी मुंबई:

गेल्या अनेक दिवसांपासून म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची मोठी (Cidco House Lottery 2024) चर्चा सुरू आहे. दरम्यान आता सिडकोच्या घरांच्या लॉटरी जाहीर होणार आहेत. याअंतर्गत तब्बल 40 हजार घरांची विक्री होणार आहे. 

पुढील महिन्यात दसऱ्याला सिडकोच्या घरांचा धमाका होणार आहे. रेल्वे स्थानकाशेजारी बांधलेल्या 40 हजार घरांची लॅाटरी निघणार आहे. येत्या दसऱ्याला सिडको धमाका करणार असून घर घेणारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. सिडकोने आजपर्यंत रेल्वे स्थानका शेजारी उभारलेल्या घरांची लॉटरी कधीच काढली नव्हती. मात्र या वेळेला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 40 हजार घरांची लॅाटरी निघणार आहे. सिडकोने वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी घरे बांधली आहेत. सध्या 67 हजार घरांचे काम सुरू असून 40 हजार घरांचं बांधकाम पूर्ण झालं आहे. अद्याप या घरांच्या किमती समोर आलेल्या नाहीत. 

सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही प्रगतीपथावर आणले आहे. येथील एक रनवेचं बांधकाम पूर्ण झालं असून दुसऱ्याचं सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
तिरुपती बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी ! प्रयोगशाळेतील रिपोर्टमधून सत्य उघड
Cidco House : रेल्वे स्टेशनशेजारी घर खरेदी करता येणार; सिडकोच्या 40 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त दसऱ्याला!
Uddhav Thackeray's announcement to withdraw mahavikas aghadi Maharashtra bandh badlapur case
Next Article
'महाराष्ट्र बंद मागे पण...', उद्धव ठाकरे काय म्हणाले?