Navi Mumbai News: पहिले कुरवाळलं, नंतर उचललं, मांजराच्या पिल्लाला पिशवीत कोंबलं, जोडप्याने पुढे जे केलं ते...

आपल्याला कुणी पाहत नाही याची खात्री करून पकडलेली मांजर तो आपल्या घरात घेवून जातो. हे सर्व चित्रिकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे 
  
प्राणी प्रेमी आपल्या घरी नक्की कोणता ना कोणता प्राणी पाळतात. मग तो कुत्रा असो की मांजर. असे पाळीव प्राणी आपल्याला अनेक घरात दिसतात. जसे प्राणी प्रेमी आहेत तसं काहींना या पाळीव प्राण्यांचा भलताच राग येत असतो. या प्राण्यांची त्यांना अडचण होते. त्यातूनच ते कुत्रा असो की मांजर असो त्यांचा द्वेश करतात. त्यातून या प्राण्यांसोबत हिंसाही केली जाते. असाच एक प्रकार नवी मुंबईतल्या एका रहिवाशी सोसायटीमध्ये घडला आहे. इथं एका जोडप्याने चक्क पाळीव मांजरीला गायब केले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे. आता या मांजराच्या पिल्लाला शोधण्याची मोहिम ही सुरू झाली आहे.   

नवी मुंबईतील खारघर सेक्टर 19 मध्ये आदित्य हाईट्स सोसायटी आहे. हा धक्कादायक प्रकार याच सोसायटीमध्ये घडला आहे. या सोसायटी मध्ये राहणारं एक जोडपं मांजरासोबत क्रूर पद्धतीने वागल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते स्पष्ट पणे दिसत आहे. फ्लॅटच्या लॉबीमध्ये मांजर आहे. या मांजरा संबंधीत व्यक्ती आधी कुरवाळताना दिसत आहे. तर बाहेरच्या बाजूला एक महिला प्लॅस्टिकची पिशवी घेवून उभी असल्याचं ही दिसत आहे. मांजराला कुरवाळून झाल्यानंतर तो व्यक्ती त्या मंजला पकडते. 

Advertisement

नक्की वाचा - Thane News: एकाच नंबरच्या दोन रिक्षा, बोकडामुळे मिळाली चोराला शिक्षा! एक चूक नडली अन् चोरीचा पर्दाफाश

त्यानंतर पकडून ते मांजराचं पिल्लू तो व्यक्ती महिलेच्या हातात असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत कोंबतो. पिशवीला गाठ मारल्यानंतर ही ती मांजर बाहेर येते आणि पुन्हा लॉबीमध्ये जाते. परत तो व्यक्ती तिला जवळ घेतो. त्या मांजराच्या पिल्ला पकडतो. त्यानंतर पुन्हा त्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकताना तो दिसत आहे. या वेळी मात्र तो पिशवीची गाठ घट्ट बांधतो. आपल्याला कुणी पाहत नाही याची खात्री करून पकडलेली मांजर तो आपल्या घरात घेवून जातो. हे सर्व चित्रिकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. 

नक्की वाचा - Pune Accident: स्कूल बसमध्ये 50 चिमुकले, मद्यधुंद चालक अन् काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, पाहा Video

या मांजराला पकडल्यानंतर पिशवीत पकडलेलं मांजर अज्ञानस्थळी फेकल्याची माहिती आता समोर येत आहे. सोसायटी मधील सीसीटीव्हीमध्ये मांजराला पिशवीमध्ये भरतानाचा व्हीडिओ  समोर आला असून यावर सोसायटी मधील इतर रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. तर प्राणी प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. मांजरी सोबत क्रूरतेने वागणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सोसायटी मधील रहिवासी आता त्या पाळीव मांजरीचा शोध घेत आहे. शिवाय  खारघर पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल करण्यात आली आहे.


Topics mentioned in this article