प्रथमेश गडकरी, नवी मुंबई
सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची मानसिकता सध्या तरुणांची झाली आहे. जीव धोक्यात घालून रिल्स केल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहे. मात्र रिल्सच्या नादात लोकांमध्ये भीती निर्माण केल्याचा प्रकार नवी मुंबईतून समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात धावत्या इनोव्हा कारच्या डिक्कीमधून एका व्यक्तीचा हात बाहेर आला होता. इनोव्हा कारच्या मागे असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट करून पोलिसांपर्यंत पोहोचवला. या घटनेमुळे या परिसरात एकच परिसरात खळबळ उडाली होती.
पाहा VIDEO
व्हिडीओ हाती लागल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. त्यावेळी सदर कारचा शोध घेऊन कारमालक व इतर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर अशा प्रकारची धोकादायक कृती केल्यामुळे संबंधित वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
(नक्की वाचा - Mumbai AC Local : मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या संख्येत वाढ, बदलापुरातून सकाळीही AC लोकल सुटणार)
या प्रकरणी कोपरखैरणे येथे राहणारे 25 वर्षीय मीनहाज मोहम्मद अमीन शेख , इंजमाम अख्तर रजा शेख , 24 वर्षीय शहावार तारीख शेख आणि मीरा रोडचा रहिवाशी 30 वर्षीय मोहम्मद अनस अहमद शेख यांच्याविरोधात पोलिसांना कारवाई केली आहे. तपासाअंती हा प्रकार कुठल्याही गुन्हेगारी हेतूने नसून, लॅपटॉप विक्रीसंदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्धसाठी प्रमोशनल व्हिडिओ (रील्स) तयार केल्याचं स्पष्ट झालं आहे.