जाहिरात

NCP News: चाकणकरांशी पंगा भोवला; रुपाली ठोंबरेंची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी; आणखी एका बड्या नेत्याला वगळलं

NCP New Spokespersons List: अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आमदार अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांना प्रवक्तेपदाची संधी मिळाली नाही याकडे त्यांच्या मागील वक्तव्यांचा परिणाम म्हणून पाहिले जात आहे.

NCP News: चाकणकरांशी पंगा भोवला; रुपाली ठोंबरेंची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी; आणखी एका बड्या नेत्याला वगळलं

NCP Appoints New Spokespersons: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत मोठे बदल केले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नवीन यादी जाहीर केली आहे. या यादीत काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर काही महत्त्वाच्या नेत्यांना प्रवक्तेपदावरून वगळण्यात आले आहे.

राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरील टीका रुपाली ठोंबरे यांनी भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांची भेट देखील घेतली होती.

अमोल मिटकरींनाही वगळले

अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आमदार अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांना प्रवक्तेपदाची संधी मिळाली नाही याकडे त्यांच्या मागील वक्तव्यांचा परिणाम म्हणून पाहिले जात आहे.

नवीन प्रमुख प्रवक्ते

अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिमा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सूरज चव्हाण, विकास पासेलकर, श्याम सनेर यांना प्रवक्तेपदी संधी मिळाली आहे.

वगळण्यात आलेले महत्त्वाचे चेहरे

अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे, वैशाली नागवडे, संजय तटकरे यांना प्रवक्तेपदावरून वगळण्यात आले. संजय तटकरे यांची नियुक्ती 'कार्यालयीन चिटणीस' म्हणून करण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com