जाहिरात

Ajit Pawar : 66 वर्षे 6 महिने 6 दिवस! अजित पवारांना 6 च्या फेऱ्याने घेरलं; 6 आकडा अन् मृत्यूचा काय आहे संबंध?

अजित पवार यांच्यासाठी ६ आकडा दुर्देवी ठरल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. ६ आकड्याचा आणि अजित पवारांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का?

Ajit Pawar : 66 वर्षे 6 महिने 6 दिवस! अजित पवारांना 6 च्या फेऱ्याने घेरलं; 6 आकडा अन् मृत्यूचा काय आहे संबंध?

Deputy Chief Minister Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज २८ जानेवारी २०२५ रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या अकाली एग्झिटमुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राजकारणातील दिलदार माणूस गमावली खंत व्यक्त केली जात आहे. अजित पवार बारामतीच्या विकासासाठी खूप झटले, शेवटी त्याच मातीत त्यांचा दुर्देवी शेवट झाला. दरम्यान अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांचा मृत्यूचा संबंध ६ आकड्याशी जोडला जात आहे. 


अजित पवार आणि '६' या आकड्याचं काय आहे कनेक्शन?

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ चा. अजित पवारांचा मृत्यू २८ जानेवारी २०२६. म्हणजे अजित पवार गेले तेव्हा अजित पवारांचं वय होतं ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस. योगायोगमध्ये अजित पवारांनी ६ वेळा विविध सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. त्यामुळे त्यांचे आणि ६ आकड्याचं कनेक्शन जोडलं जात आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे विविध व्हिडिओ समोर येत आहेत. ज्यामध्ये अजित पवार यांच्यासाठी ६ आकडा दुर्देवी ठरल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या सर्व चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. 

नक्की वाचा - Ajit Pawar Plane Crash : आयुष्यभर घड्याळ्यासोबत जगले अन् शेवटही...; विमान अपघातानंतर अशी पटली दादांची ओळख

अजित पवारांवर कधी होणार अंत्यसंस्कार?

अजित पवारांवर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्या आधी अंत्यदर्शनासाठी अजित पवाराचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती राजेद्र पवार यांनी दिली आहे. अजित पवार कुटुंबातील सर्वजण बारामतीत दाखल झाले आहेत. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले आहेत.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com