जाहिरात

सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार? विलीनीकरण, शपथविधी आणि पवार कुटुंबातील चर्चा; DCM सुनेत्रा पवार करणार खुलासा

Sunetra Pawar: राष्ट्रवादी विलीनीकरण ते पवार कुटुंबातील चर्चा, यासंदर्भात सुनेत्रा पवार लवकरच भाष्य करणार असल्याची माहिती समोर येतेय.

सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार? विलीनीकरण, शपथविधी आणि पवार कुटुंबातील चर्चा;  DCM सुनेत्रा पवार करणार खुलासा
"Sunetra Pawar News: सुनेत्रा पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष"
PTI

Sunetra Pawar: राज्यातील राजकारण सध्या प्रचंड तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणावरून आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवरून नवनवे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व घडामोडींवर स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढील काही दिवसांत स्पष्ट आणि सविस्तर भूमिका मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचं लक्ष आता त्यांच्या संभाव्य खुलाशाकडे लागले आहे.

सुनेत्रा पवार नेमके काय बोलणार? सर्वांचं लक्ष

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा निर्णय इतक्या घाईघाईमध्ये का घेण्यात आला? अशी विचारणा करत याबाबत विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. विशेषतः हा निर्णय घेण्याआधी पवार परिवारात चर्चा झाली होती का? याबाबत वरिष्ठ नेत्यांना कल्पना देण्यात आली होती का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी भूमिका काय होती आणि हा निर्णय अचानक कसा घेण्यात आला? यावरही संभ्रम कायम आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सर्व गोष्टींवर लवकरच भाष्य करणार आहेत.

(नक्की वाचा: Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली नसती तर मायलेकरांना वाळीत टाकलं असतं, कट्टर विरोधकाचा गंभीर आरोप)

सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार?

राजकीय जाणकारांच्या मते, सुनित्रा पवार यांचे भाष्य केवळ आरोपांना उत्तर देणारे नसेल, तर त्यातून आगामी राजकीय दिशा स्पष्ट होण्याचीही शक्यता आहे. पक्ष विलीनीकरणाबाबत त्यांना काही माहिती होती का? यावर त्या नेमके काय बोलणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच शपथविधीच्या निर्णयामागील अंतर्गत चर्चा, अति कमी वेळात घेण्यात आलेला निर्णय, यामागे नेमकी काय आणि कोणाची भूमिका होती? याबाबतही अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(नक्की वाचा: Ajit Pawar Video: अजित पवारांना असे पाहून रडू आवरणार नाही, जय पवार यांनी शेअर केला स्तब्ध करणारा व्हिडीओ)

राजकारणात नवे वादळ उठणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, हा खुलासा केवळ राजकीय स्पष्टीकरणापुरता मर्यादित न राहता, पवार परिवारातील संवाद, मतभेद आणि समन्वय यावरही प्रकाश टाकू शकतो. त्यामुळे हा खुलासा केवळ समर्थकांसाठीच नव्हे तर विरोधकांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नवे वादळ उठण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार कधी बोलणार आहेत? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com