NDTV Maharashtracha Jahirnama : लाडक्या बहिणीचा महायुतीतील लाडका भाऊ कोण? सुनील तटकरे कुणाचं नाव घेतलं?

Sunil Tatkare in NDTV Conclave : यावेळच्या निवडणुकीतील वातावरण वेगळं आहे. मात्र मतदाराला गृहीत धरण्यासाठी मोठी चूक असणार आहे. मागच्या चुका दुरुस्त करुन अधिक ताकदीने आम्ही समोर जात आहोत, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरु आहे, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. विरोधकांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलं आहे. NDTV मराठीच्या 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रम सुनील तटकरे सहभागी झाले होते.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लाडक्या बहीणीचा लाडका भाऊ कोण? याबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी म्हटलं की, बहिणीचे तीन लाडके भाऊ असू शकतात. आम्ही महाराष्ट्रात फिरतो, लोकांना या योजनेला असलेला प्रतिसाद आम्ही अनुभवतो. महायुती सरकारची ही योजना आहे. सामुदायिकरित्या हा निर्णय घेण्यात आला आहे. 

जवळापास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे. ही श्रेयवादाची लढाई नाही. सर्व योजना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीच होत असतात. त्यामुळे आमच्यात याबाबत काही गैरसमज नाही. मात्र लोकसभेत मिळालेलं यश मिळणार नाही, हे लक्षात आल्याने अशा प्रकारे महायुतीत विसंवाद असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.  

Sunil Tatkare

(नक्की वाचा-  NDTV Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र)

लोकसभेतील लोकांची नाराजी आम्ही दूर केली

यंदाची निवडणूक फार वेगळी आहे. एका वेगळ्या पार्श्वभूमीवरची ही निवडणूक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसमोर दोघांसमोर आव्हाने आहेत. महाराष्ट्राचा विकास करणे हा आमच्यासमोरील अजेंडा साफ आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फरक आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान आमच्याविरोधात असलेली नाराजी दूर करण्यात आम्हाला यश आलं आहे. यावेळच्या निवडणुकीतील वातावरण वेगळं आहे. मात्र मतदाराला गृहीत धरण्यासाठी मोठी चूक असणार आहे. मागच्या चुका दुरुस्त करुन अधिक ताकदीने आम्ही समोर जात आहोत, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं. 

Advertisement

(नक्की वाचा- 'नांदगाव मतदारसंघात कांदेंची दहशत', छगन भुजबळांचा थेट आरोप)

महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा मिळाल्या या जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला उत्तर देतांना सुनील तटकरे यांनी म्हटलं, भाजप 105+10 अशा 115, राष्ट्रवादी काँग्रेस 50, शिवसेना 50 एकूण 215 आमदार झाले. उरल्या 63 जागा. तरी आमचं जागावाटप सुरळीत पार पडलं. महाविकास आघाडीत मात्र सगळं मोकळं होतं. शिवसेना ठाकरे गटाचे 14 आमदार, शरद पवार गटाचे 10 आमदार, काँग्रेसचे 44 त्यांच्याकडे जागावाटपासाठी खूप जागा होत्या. मात्र तरीही त्यांचं जागावाटप अद्याप झालेले नाही. प्रदीर्घ अनुभव असलेले शरद पवारसोबत असूनही त्यांना हा तिढा सोडवता आलेला नाही. महायुतीत असं झालेलं नाही, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.