
NDTV Manch : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले की साताऱ्यातील आपल्या दरेगावी जातात, असा विरोधकांकडून आरोप केला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काही आलबेल नाही, असंही विरोधकांकडून सातत्याने बोललं जातं. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भासले आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाष्य केलं आहे. एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी आले की नाराज आहेत असं बोलणे चुकीचं आहे. हे सगळं स्क्रीनवर तयार केलेलं वातावरण आहे. आम्ही तिथे त्यांना भेटायला जातो. आम्ही गेलो की ते आम्हाला त्यांची शेती दाखवतात. एकनाथ शिंदे नाराज असते तर आम्हाला कुणालाच भेटले नसते. प्रत्येकजण आपल्या गावी जातो. त्यामुळे ते गावी आल्याने त्याची वेगळी चर्चा करण्याचं कारण नाही, असं मला वाटतं."
(नक्की वाचा- NDTV Marathi Manch: 'राज्यातील तपासणी लॅबबाबत कडक कायदा..' आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी घोषणा)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाचती जबाबदारी तुमच्याकडे आहेत. ही दोन्ही खाती सांभाळताना कसरत करावी लागते का? यावर बोलताना मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं की, "मला तसा कधीही अनुभव आलेला नाही. दोघांमधील नाराजीच्या चर्चांची फक्त मीडियातून चर्चा केली जाते."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world