अक्षय कुडकेलवार
मुंबई महापालिकेची निवडणुकीची कधी ही घोषणा होवू शकते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. या सर्व गडबडीत एक असा पक्ष आहे ज्याच्याडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे. तो पक्ष ना शिवसेना आहे ना भाजप, ना काँग्रेस. तो पक्ष आहे अरूण गवळीचा अखिल भारतीय सेना. अरूण गवळीचा पक्षा मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार आहे. विशेष म्हणजे अरूण गवळीची लेक योगिता गवळी भायखळ्यातून मैदानात उतरणार आहे. योगिताने हा निर्णय का घेतला? डॅडी तिचा प्रचार करणारा का? राजकारणाबाबत ती काय विचार करते या सर्व प्रश्नांची उत्तरं योगिता यांनी NDTV मराठीला दिलेल्या खास मुलाखती गळळी स्टाईलने दिली आहेत.
योगिता यांनी सांगितले की आपण ही निवडणूक लढणार आहोत. त्याची तयारी वर्षभरापासून सुरू केली होती. अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून आपण लोकांच्या संपर्कात आहोत. ही निवडणूक आपण लोक आग्रहास्तव लढत असल्याचं ही त्यांनी सांगितलं. याच भागातून आपली बहीण गीता गवळी आधी नगरसेवक होत्या. डॅडी म्हणजे अरूण गवळी आमदार होते. त्यामुळे इथल्या लोकांसोबत आपलं एक वेगळं नातं आहे असं ही त्यांनी सांगितलं. राजकारणात येण्या आधी आपण शिक्षण क्षेत्रात काम करत होतो. शिवाय मी पॉलिटीकल स्टुडंट होती. एलएलबी केलं आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. ती वेळ आता आली आहे त्यामुळे आपण राजकारणात उतरलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ही निवडणूक लढण्यासाठी आपण पूर्ण पणे तयार आहोत. लग्ना आधी गवळी आणि लग्नानंतर वाघमारे ही आपली खरी ओळख असल्याचं त्यांनी सांगितले. या ओळखीवरच आपण निवडणूक लढणार असल्याचं त्या म्हणाल्या. डॅडी म्हणजेच अरूण गवळी ने या भागात लोककल्याणाची कामं केली आहे. ते आपण पाहीले आहे. त्यामुळे या गोष्टी त्यांच्याकडून शिकल्याचं त्यांनी सांगितलं. भायखळा हा आमचा बालेकिल्ला आहे. मी लहानाची मोठी भायखळ्यात झाली आहे. त्यामुळे इथल्या लोकांच्या अडीअडचणी मला माहित आहे. त्यामुळे इथल्या लोकांसाठी चांगलं काम करण्याची आपली भावना आहे. डॅडीनी खूर काम केलं आहे. तेच काम आता आपल्याला पुढे न्यायचं आहे. निगेटीव्ह पॉलिटीक्स आपल्याला नको. आपल्याला दुसऱ्या कोणत्याही पक्षाने ऑफर दिलेली नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय
अरूण गवळी म्हटलं की अंडरवर्ल्ड डॉन. पण हे आम्ही लहानपणापासून ऐकत आहोत. पण अरूण गवळी काय आहे हे तिथल्या लोकांना चांगल्या प्रकारे माहित आहे. त्यांचा मोठा त्याग आहे. त्यांनी भायखळ्याच्या लोकांसाठी खूप काही केलं आहे. लोक त्यांनी डॅडी बोलतात त्यातच सर्व काही आलं. त्यांनी भीती पोटी नाही तर आदर म्हणून डॅडी बोललं जातं असं ही त्या म्हणाल्या. युवकांनी राजकारणात यायला पाहीजे. त्यांनी विकासाचं राजकारण केलं पाहीजे. जाती धर्माचे राजकारण नको. राजकारणात सध्या नैतिकता राहीली नाही. लोककल्याण हेच राजकारण असलं पाहीजे. तोच आपला विचार आहे हे सांगायला ही त्या विसरल्या नाहीत.
आपल्या विरोधात कोण लढणार आहे याचा विचार आपण करत नाही. आपली काकू आपल्या विरोधात मैदानात उतरण्याची चर्चा आहे. त्या जरी समोर असल्या तरी आपण लढणार हे आपलं ठरलं असल्याचं ही त्यांनी सांगितलं. या निवडणूकीत डॅडींचे मार्गदर्शन लाभेल. ते माझ्या मागे असतील. प्रचारही करतील असं त्या म्हणाल्या. ठाकरे बंधू एकत्र लढत आहे. त्यांच्याकडून आपल्याला कोणती ही ऑफर आलेली नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. पण पुढे काय होईल हे माहित नाही. राजकारणात सध्या कधी काय कुठे होईल हे सांगता येत नाही असं ही त्या म्हणाल्या. मात्र आपण विजय होणार आहोत. हा आपला विश्वास आहे. हा विश्वास आपल्याला भायखळ्याच्या लोकांनी दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world