गेल्या काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक महापालिकांमध्ये प्रशासक आहेत. मुंबई महापालिकेतही तिच स्थिती आहे. अशा वेळी नगरसेवक नाहीत. त्यामुळे किती अडचणी येतात यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. शिवाय मुंबई महापालिकेच्या विभाजनावर ही त्यांनी आपली भूमीका मांडली आहे. एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात त्यांनी आपली मतं व्यक्त केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा ))
गेल्या काही वर्षात निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे नगरसेवक मुंबई महापालिकेत नाहीत. निवडणुका कधी होतील हे कोर्ट ठरवणार आहे. पण नगरसेवक महापालिकेत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत अशी स्पष्ट कबुली मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. छोटे स्थानिक स्तरावर सुटणारे प्रश्न आहेत, त्यासाठी ही आयुक्तांना उपायुक्तांना लक्ष्य घालावे लागत आहे. जर नगरसेवक असतील तर ते प्रश्न त्याच ठिकाणी सोडवले जातात. नगरसेवक वार्ड स्तरावर संपर्क करुन मार्ग काढत असतात असं गगराणी म्हणाले.
पण नगरसेवक नसल्याने हे प्रश्नही आता आमच्यापर्यंत येत आहे. कुठे पाणी नसेल, दुषीत पाणी येत असेल, कचरा उचलला जात नसेल, असे स्थानिक आणि छोट्या कामासाठी नगरसेवक हा महत्वाचा दुवा असतो. नगरसेवक ते वॉर्ड लेवलला हे प्रश्न सोडवत असतात. पण आता तसं होत नाही. शिवाय लोकनियुक्त नगरसेवक, पदाधिकारी असतील तर प्रत्यक्षात ग्राऊंडवर काय सुरू आहे याची माहिती मिळत असते. ती माहिती सध्या मिळत नाही असं ही ते म्हणाले. पण लवकरच त्यावर तोडगा निघेल असं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - NDTV Marathi Manch: वाढवण बंदर गेमचेंजर ठरणार, नितेश राणेंना विश्वास
मुंबई मनपाची स्थापना 1867 साली झाली. तेव्हा पासून मुंबई मनपाचा पसारा दरवर्षी वाढत चालला आहे. 75 हजार कोटीचं मनपाचं बजेट आहे. मुंबई महापालिकेचे दिडलाख कर्मचारी आहेत. अशा वेळी मुंबई महापालिकेचे विभाजन होणार का असा विषय येतो. मुंबई उपनगरासाठी वेगळी महापालिका असावी असं ही बोललं जातं. पण राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर तसा कुणाचाही आग्रह नाही. मुंबई मनपा आपली सेवा देण्यात सक्षम आहे. जर मुंबई मनपाची विभागणी झाली तर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होवू शकतात असं ही ते म्हणाले. त्यामुळे सध्याच्या स्थिती मुंबई मनपाच्या विभाजनाचा विषय गगराणी यांनी फेटाळून लावला आहे.
मुंबई महापालिका चांगल्या दर्जाच्या सेवा मुंबईकरांना देत आहे. मनपाची तेवढी क्षमता आहे असं ही ते म्हणाले. वेगवेगळ्या नागरी सेवा मनपा देत आहे. अगदी रस्त्यावरची कुत्री पकडण्यापासून ते हार्ट ट्रान्सप्लांट करण्यापर्यंत सेवा दिली जाते. शिवाय पाच लाख विद्यार्थ्यांना शिकवणे ते लोकांना पाणी पुरवण्या करण्याची ही सेवा दिली जाते. दरम्यान पुढच्या काळात मुंबईत कुठेही एका तासात जाता यावं, मुंबईकरांना चोवीस तास पाणी द्यावं, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करणे यावर आमचा भर राहील असं त्यांनी स्पष्ट केलं.