
पायाभूत सुविधा,दळणवळ, पर्यटन यावर महायुती सरकारचा भर असेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल. शिवाय विकासाचा नवा अध्यायही सुरू होईल असं ही शिंदे म्हणाले. एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात त्यांनी आपला रोडमॅप सांगितला. मुख्यमंत्री असताना महत्वाच्या प्रकल्पांवर असलेल्या स्थगिती आपण उठवल्या, त्यामुळे मुंबईतली वाहतूक व्यवस्था सुसाट झाली हे ही त्यांनी यावेळी सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा ))
मुख्यमंत्री होण्या आधी अडीच वर्ष स्थगितीचं सरकार होतं अशी टिका ही शिंदे यांनी केला. आमचं सरकार प्रगतीचं आणि समृद्धीचं सरकार होतं असं ही ते म्हणाले. आम्ही आल्यानंतर बंद प्रकल्प सुरू केले. आम्ही सर्व स्टे हटवले. धडाधड कामं सुरू झाली. मुंबईतले प्रकल्प मार्गी लागले. त्यामुळे मुंबई आणखी वेगवान झाली. पायाभूत सुविधा जिथे जास्त, त्या राज्याचा विकास वेगात होता. असं सांगत त्यांनी आपण विकासाला प्राधान्य दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं. हीच दिशा या पुढच्या काळात ही असेल असं ही त्यांनी सांगितलं. आमचं विकासाचं व्हिजन आहे. आम्ही टिम म्हणून काम करत असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - NDTV Marathi Manch: वाढवण बंदर गेमचेंजर ठरणार, नितेश राणेंना विश्वास
सध्या राज्यात आठ ते दहा हजार कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. दळणवळणाच्या सुविधा महत्वाच्या आहेत. मुंबई नागपूर हा रस्ता आमच्या सरकारने चांगल्या पद्धतीने तयार केला. त्यामुळे सात तासात मुंबईत पोहोचता येतं. वेळ, इंधन त्यामुळे वाचत आहे. हा एकपर्यावरण पुरक प्रकल्प आम्ही करून दाखवला असं ही शिंदे यावेळी म्हणाले. मुंबईत ही सिमेंटचे रस्ते करण्याचं काम सुरू आहे. कोण म्हणतं कामं झाली नाही. सध्या 400 किमी रस्त्याची कामं मुंबईत सुरू आहे. 31 मेपर्यंत ती पूर्ण केली जातील. त्यानंतर कुठेही रस्ता खोदला जाणार नाही. पावसाळ्यात कुणालाही त्रास होणार नाही. पावसाळ्यानंतर 300 किमीचे सिमेंटचे रस्ते केले जातील. असे 700 किमीचे रस्ते मुंबईत सिमेंटचे तयार होतील असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं. खड्डे मुक्त मुंबई तुम्हाला पाहायला मिळे असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
आमची भूमीका ही बदलेली नाही. आम्ही तिघेही टिम म्हणून काम करत आहोत. आज ही तसचं काम करतोय. गाडी तिच आहे. इंजिन ही तेच आहे. आमची विकासाची गाडी आहे. इथं खुर्चीचा अजेंडा आमचा नाही असं ही ते म्हणाले. आपण मुख्यमंत्री असताना धडाकेबाज निर्णय घेतले. त्यासाठी माणूस धडाकेबाज असावा लागतो. आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला होता. एकीकडे विकास दुसरीकडे लोकांना योजना आम्ही दिल्या. लोकांना चांगले दिवस आणण्याचे काम सरकारचे आहे ते आम्ही केले. काही जण सोन्याचा चमचा घेवून जन्माला आले. पण आम्ही सर्व सामान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे प्रयत्न करत आहोत असं शिंदे म्हणाले.
NDTV Marathi Manch: 'राज्यातील तपासणी लॅबबाबत कडक कायदा..' आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी घोषणा
आपण काही लोक कल्याणकारी योजना जाहीर केल्या. त्यामुळे अर्थ व्यवस्था बिघडली असा आरोप होतो. पण ते चुकीचे आहे. आम्ही लोन घेण्याच्या मर्यादेत आहोत. आम्ही योजना आणूनही आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही. आम्हाला चिंता नाही. जीडीपी मध्ये महाराष्ट्र पहिला आहे. एक्सपोर्ट, परदेशी गुंतवणूक, ओद्योगिक उत्पादनात ही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधा, इंटरनेट युजरमध्ये महाराष्ट्र पहिला आहे असं ही ते म्हणाले. या काळात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पर्यटनावर आम्ही काम करत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय रेवस रेडी हा रस्ता झाल्यानंतर कोकणातील पर्यटन आणखी बहरेल असंही ते म्हणाले. कोकणात ग्रिनफिल्ड रोडचं काम लवकरच होईल असं ही त्यांनी सांगितलं. मुंबईत एण्ड टू एण्ड मेट्रो करायची आहे. दुसरा टप्पा पुर्ण होईल. एमएमआरमध्ये मेट्रोचे जाळे पूर्ण करणार आहे असं ही त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world