
NDTV Marathi Manch : नवी मुंबईमधील विमानतळाची मुंबईसह संपूर्ण देशाला गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा आहे. या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. ऑगस्ट महिन्यात विमानतळाचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. NDTV मराठी मंच कार्यक्रमात हे विमानतळ कसं असेल याचे अंतररंग नवी मुंबई विमानतळाचे प्लानिंग आणि डिजाईन हेड चारुदत्त देशमुख यांनी उलगडून सांगितले. हे विमानतळ संपूर्ण जगभर बेंचमार्क ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विमानतळ होईल याचा विश्वास नव्हता...
आम्हाला विमानतळासाठी जी जागा देण्यात आली होती, तिथं विमानतळ होऊ शकतं यावर विश्वास नव्हता. येथील भौगोलिक परिस्थिती खूप आव्हानात्मक होती. या जागेला विमानतळासाठी तयार करणे हे आमचं मुख्य आव्हान होतं. आम्ही सर्वांच्या सहकार्याने मेहनत घेतली.
2017 साली साईटवर प्रत्यक्ष काम झालं. कोव्हिड काळातही काम सुरु होतं. ऑगस्ट महिन्यात पहिला टप्पा आम्ही सुरु करु. आम्ही विमानतळाची क्षमता वाढवली. अन्यथा तो 10 वर्षांमध्येच फुल झाला असता. त्यामुळे नव्या विमानतळाची गरज आम्ही 15 वर्ष पुढे ढकलली आहे, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : NDTV Marathi Manch: तरुणांनो जरुर वाचा! पायलट कसं व्हायचं? सेमीकंडक्टर चीप्स क्षेत्रातील संधी अन् भरपूर पगार )
दोन विमानतळांना मेट्रो जोडणार
दोन विमानतळ एकमेकांना जोडलेले पाहिजेत ही धारणा बरोबर नाही. कोणतही विमानतळ स्वतंत्रपणे काम करतं. हे सत्य असलं तरी आपण दोन्ही विमातळाला जोडणारी मेट्रो रेल्वे सुरु करत आहोत. त्याचा फायदा या भागातील रहिवाशांना होणार आहे.
हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमानतळ असेल. त्याचबरोबर आपल्या देशातील सर्वात मोठं जनरल विमानांचं टर्मिनल इथं उभा करण्यात आला आहे. त्याचा फायदा आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला होईल. इथं 90 प्रायव्हेट जेट उभे राहू शकतील. या उद्योगाला याचा मोठा फायदा होईल. त्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ पुणे आणि मुंबई शहरात उपलब्ध आहे. त्याला चालना मिळेल, असं देशमुख यावेळी म्हणाले.
मालवाहतूक करण्यासाठी इथं पाच कार्गो टर्मिनल उभारण्यात आली आहेत. त्याची क्षमता मुंबईच्या विमानतळाच्या क्षमतेपेक्षा तिप्पट आहे. हा विमानतळ जगभरातील विमानतळासाठी बेंचमार्क असेल. जगभरातील लोकं आम्हाला असा विमानतळ हवा असं म्हणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world