NEET पेपरफुटीचं लातूर-पुणे कनेक्शन नेमकं काय? पी.व्ही.कुलकर्णी खरा मास्टरमाईंड? वाचा INSIDE STORY 

देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकणात आता कारवाईला वेग आला आहे. सीबीआयची पथकं लातूरपासून पुण्यापर्यंत आरोपींचा शोध घेत आहेत.सीबीआयने दोन दिवसात दोन प्राध्यापकांना अटक केली आहे. वाचा इनसाईड स्टोरी.

जाहिरात
Read Time: 3 mins
NEET Paper leak Inside Story

अजिंक्य धायगुडे/ विष्णु बुर्गें, प्रतिनिधी

NEET Paper Leak Latest Update :  देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकणात आता कारवाईला वेग आला आहे. सीबीआयची पथकं लातूरपासून पुण्यापर्यंत आरोपींचा शोध घेत आहेत.सीबीआयने दोन दिवसात दोन प्राध्यापकांना अटक केली आहे. यामध्ये पी.व्ही.कुलकर्णी आणि मनिषा मांढरे अशा दोन प्राध्यापकांचा समावेश आहे.या दोन्ही व्यक्ती एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी संबंधित असल्यामुळे नीट परीक्षेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी पी व्ही कुलकर्णी आणि मनिषा वाघमारे यांना न्यायालयाने दहा दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे.

या प्रकरणाचे धागेदोरे पी.व्ही कुलकर्णी  या प्राध्यपकाभोवती फिरत आहेत. पी.व्ही.कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा नामांकित प्राध्यापक आहे.लातूर येथील नामांकित 'दयानंद महाविद्यालयात' कुलकर्णीने तब्बल 28 वर्षे अध्यापनाचे काम केले. 5 ते 6 वर्षांपूर्वी तो सेवेतून निवृत्त झाला होता. लातूरच्या 'शिक्षण पंढरी'त बारावी विज्ञान शाखा आणि 'नीट'परीक्षांच्या मार्गदर्शनात त्याचा मोठा सहभाग होता. 

Advertisement

कुलकर्णीने रसायनशास्त्राचा पेपर फोडला?

पी.व्ही कुलकर्णी हा मूळचा लातूरचा.लातूरमधील कैलास नगर परिसरात त्याचं घर आहे.पण निवृत्तीनंतर त्याने पुणे गाठलं.पुण्यातच राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरूवात केली.मात्र मार्गदर्शनासोबतच नीट पेपर फोडण्याचं रॅकेटही आकार घेत होतं.नीट परीक्षा प्रक्रियेत थेट सहभाग असल्याने त्याला मूळ प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचण्याची मूभा होती. याच पदाचा आणि विश्वासाचा गैरवापर करून कुलकर्णीने रसायनशास्त्राचा पेपर फोडल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. 

नक्की वाचा >> NEET Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी आणखी एका मास्टरमाईंडला अटक, पुण्यातील 'ती' शिक्षिका गजाआड

सीबीआयने पुण्यातून आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.सीबीआयच्या तावडीत असलेल्या मुख्य आरोपींमध्ये पी.व्ही.कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. नीट पेपर सेट करण्याच्या समितीमध्ये सदस्य होता.त्याच्यावर रसायनशास्त्राचा पेपर सेट करणाची जबाबदारी होती.मनिषा मांढरे ही बॉटनी आणि झूलॉजीची प्राध्यापक आहे.तिच्यावर बॉटनी-झूलॉजीचा पेपर सेट करण्याची जबाबदारी होती.  

या दोन्ही प्राध्यापकांचं ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनिषा वाघमारेसोबत कनेक्शन होतं. मनिषाने तिच्या घरी 'नीट'विद्यार्थ्यांसाठी खासगी क्लास भरवले. विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पुरवली. तेच प्रश्न नीट परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेशी तंतोतंत जुळले. या कनेक्शनमधील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मनिषा वाघमारे आणि मनिषा मांढरे या दोघी एकाच सोसायटीमध्ये राहत असल्याचं समोर आलं आहे. 

नक्की वाचा >> Heat Alert : महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेचा कहर, 2 दिवसांपूर्वीच 45 चा पारा ओलांडला

त्या सोसायटीमधून नीट पेपरफुटीचं रॅकेट चालवायचा

पुण्यातील बिबवेवाडी परीसरातील या सोसायटीमधून हे नीट पेपरफुटीचं रॅकेट चालवलं जात होतं. धक्कादायक बाब म्हणजे नीटचा पेपर लीक करणारी प्राध्यापक मनिषा मांढरे आणि नीटची परीक्षा मुलांना पेपर पुरवणारी मनिषा वाघमारे या एका सोसायटीत राहत होत्या.या दोन आरोपींचं कनेक्शन असण्याची दाट शक्यता असल्यामुळे सीबीआयचं पथक त्या दिशेने तपास करत आहे. 

Advertisement

पी.व्ही.कुलकर्णी आणि मनिषा मांढरे यांच्यासारख्या प्राध्यापकांमुळे संपूर्ण शिक्षकी पेशावरच काळा डाग लागलाय.पी.व्ही कुलकर्णी हा शिक्षणाची पंढरी मानल्या जाणाऱ्या लातूरातून येत होता.त्यामुळे उत्कृष्ट शिक्षणासाठी ओळखलं जाणार लातूर पॅटर्न पुन्हा पेपरफुटीच्या लातूर पॅटर्नसाठी बदनाम होतंय,अशी प्रतिक्रिया दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस.बेल्लाळे यांनी दिली आहे.  

लातूर ते पुणे या कनेक्शनमधून उघड झालेलं हे रॅकेट शिक्षण व्यवस्थेलाच हादरा देणारं ठरतंय.सीबीआयचा तपास जसजसा पुढे सरकेल,तसतसे या प्रकरणातील नवे धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी कोणकोणते मोठे मासे जाळ्यात अडकणार,याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Advertisement