जाहिरात

NEET Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी आणखी एका मास्टरमाईंडला अटक, पुण्यातील 'ती' शिक्षिका गजाआड

नीट पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात आणखी एका मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे.

NEET Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी आणखी एका मास्टरमाईंडला अटक, पुण्यातील 'ती' शिक्षिका गजाआड
NEET Paper Leak Case Latest Update
पुणे:

ऋतिक गणकवार/अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी 

NEET Paper Leak Latest Update : नीट पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.राजस्थानपासून राज्यातील नाशिक,पुण्यापर्यंत या प्रकरणाचे कनेक्शन उघडकीस आले आहेत. सीबीआयने नुकतच मनीषा वाघमारेला अटक केली आहे. ही खबर ताजी असतानाच आता या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात आणखी एका मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. मनीषा गुरुनाथ मांढरे असं अटक केलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. 

बायोलॉजी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात सीबीआयकडून या मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.पुण्यातील वरिष्ठ बॉटनी शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरेला दिल्लीतून अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे एनटीएकडून (NEET-UG 2026) प्रक्रियेत एक्स्पर्ट म्हणून नियुक्त केल्या गेल्या होत्या. मनीषा मांढरे मुळच्या पुण्याच्या असल्याची माहिती आहे. त्यांना बॉटनी आणि झूलॉजी प्रश्नपत्रिकांमध्ये पूर्ण ऍक्सेस होता. एप्रिल 2026 मध्ये पुण्यातील मनीषा वाघमारेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपर्क केला गेला.

नक्की वाचा >> LSG vs CSK : मिचेल मार्शनं मैदान मारलं, लखनऊचा चेन्नईविरोधात 'सुपर' विजय, प्लेऑफचं गणित बिघडलं

पुण्यातील स्वतःच्या घरी विशेष कोचिंग क्लासेस घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. क्लासदरम्यान बॉटनी आणि झूलॉजीमधील संभाव्य प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून दिले,असाही आरोप आहे.विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये प्रश्न मार्क करण्यासाठी सांगितलं, अशीही माहिती आहे.  या क्लासमध्ये सांगितलेले अनेक प्रश्न 3 मे 2026 रोजी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेत होते. परीक्षेतील प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत सीबीआयकडून देशभरातील 6 ठिकाणी छापेमरी करण्यात आली. छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे,लॅपटॉप,बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल जप्त करण्यात आले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com